म्युच्युअल फंडांमध्ये ‘एनएसीएच’ किंवा ओटीएम (वन टाइम मॅन्डेट) म्हणजे काय?

म्युच्युअल फंडाच्या योजनेसाठी एकगठ्ठा रक्कम भरण्यासाठी किंवा ‘एसआयपी’च्या साह्याने रक्कम भरण्यासाठी ‘एनएसीएच’ ही एकदाच नोंदणी करण्याचा गुंतवणूकदाराचा अधिकार (मॅन्डेट) आहे. ‘एनएसीएच’ अंतर्गत नोंदणी करून गुंतवणुकीसाठी तुम्ही कोणत्या बँकेतून पैसे योजनेमध्ये ठराविक काळानंतर परस्पर देणार हे तुम्हाला सांगायचे आहे. ही बँक तुम्ही आधी तुमच्या फोलिओमध्ये नोंदवलेलीच असणार आहे. या सुविधेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत रक्कम बँक खात्यातून योजनेकडे वळवण्याच्या सूचना तुम्ही देऊ शकता. हा अधिकार ‘एनएसीएच’ अंतर्गत तुम्ही ठराविक काळासाठी देऊ शकता किंवा तुम्ही रद्द करेपर्यंत देऊ शकता. एका म्युच्युअल फंडाच्या फोलिओसाठी एक अधिकार देणे अभिप्रेत आहे. वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांतून तुमच्या ‘एसआयपी’ सुरू असतील तर ‘एनएसीएच’अंतर्गत वेगवेगळ्या नोंदी कराव्या लागतील.

सध्या ‘एसआयपी’ नोंदणीसाठी ३० दिवस लागतात. ‘एनएसीएच’मुळे हा कालावधी १० दिवसांवर येतो. एकदा हा अधिकार किंवा मॅन्डेट दिला की मग गुंतवणूकदाराला चेक लिहून देऊन किंवा ‘पेमेंट गेटवे’च्या साह्याने ऑनलाइन पेमेंट न करता ऑफलाइनसुद्धा पैसे गुंतवता येतात. एकगठ्ठा गुंतवणूक करण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. गुंतवणूकदाराने भरलेली रक्कम प्रत्यक्ष योजनेच्या खात्यात जाण्यासाठी अल्पकाळ यामुळे लागणार आहे.

‘एनएसीएच’ किंवा ओटीएमसाठी गुंतवणूकदाराने कशी नोंदणी करावी?

म्युच्युअल फंडातील एका फोलिओसाठी एकदाच नोंदणीचे सोपस्कार पार पाडायचे आहेत. तुम्हाला केवळ योग्य प्रकारे ओटीएम अर्ज भरायचा आहे व त्यावर स्वाक्षरी करायची आहे. हा अर्ज तुमच्या बँकेकडे पाठवला जाणार असल्यामुळे त्यावरील स्वाक्षरी ही तुमच्या बँकेच्या स्वाक्षरीप्रमाणे असणे जरुरीचे आहे. या अर्जाबरोबर रद्द केलेल्या चेकची एक प्रत जोडणेही आवश्यक आहे

यापायी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अत्यंत सुलभ झाले आहे!!!!

अभिप्राय द्या!