
मुलांच्या नावे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक शक्य आहे का?
होय, कोणत्याही म्यच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेमध्ये मुलांच्या नावे पैसे गुंतवता येतात. अशा योजनांमध्ये मूल किंवा अज्ञान गुंतवणूकदार हाच पहिला किंवा एकमेव गुंतवणूकदार म्हणून ठेवता येतो. यामध्ये त्याच्या पालकांपैकी कोणीही एक किंवा न्यायालयाने मान्य केलेला पालक हा त्या योजनेचा संरक्षक (गार्डियन) म्हणून राहतो.
यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
गुंतवणूकदार अज्ञान असेल तर त्यासाठी त्याची जन्मतारीख हा त्याच पुरावा ठरतो, त्यामुळे गुंतवणुकीच्या वेळी ही तारीख व वय द्यावे लागते. यासाठी वयाचा दाखला (जन्मनोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्टची कॉपी इ.) द्यावा लागतो. प्रथमतः गुंतवणूक करण्यात येत असेल तर हे करावे लागते.
मुलांच्या नावे एसआयपी व एसटीपी सुरू करता येते काय?
होय. एसआयपी व एसटीपी यांसाठी संबंधित म्युच्युअल फंड त्या मुलाची नोंदणी करून घेतो. मात्र ही सूचना ते मूल सज्ञान होईपर्यंतच लागू राहते.
मूल १८ वर्षांचे होऊन सज्ञान झाल्यावर काय ?
एकदा मूल सज्ञान झाले की त्याच्या सर्व व्यवहारांसाठी पूर्वी दिलेल्या सूचना रद्द होतात. त्याचा फोलिओ त्याच्या पालकाकरवी होणाऱ्या व्यवहारांसाठी गोठवला जातो. असे मूल सज्ञान होण्याआधी संबंधित म्युच्यअल फंड त्याला नोटिस पाठवून मूल सज्ञान झाल्याचा पुरावा नजीकच्या काळात देण्याविषयी सांगते. त्याचप्रमाणे केवायसी प्रक्रियाही पूर्ण करावी लागते. यामुळे त्या गुंतवणूकदाराच्या फोलिओमध्ये त्याचे स्टेटस ‘मायनर’वरून ‘मेजर’ असे केले जाते.