नेमका केव्हा नवीन फंडांचा समावेश करावा?

१. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी नवीन आर्थिक ध्येयाची निर्मिती करण्याची गरज निर्माण होते. उदाहरणार्थ, कुटुंबात नवीन सदस्यांचे आगमन.

नवीन बाळाच्या आगमनामुळे वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या कालावधीत या वित्तीय ध्येयाची पूर्तता करणे गरजेचे असते. या वित्तीय ध्येयासाठी नव्याने तरतूद करण्याची असल्याने सर्वार्थाने नवीन फंडांचा संच विचारात घेणे आवश्यक असते.

२ .पगारवाढ , पदोन्नती , ह्यापायी सुद्धा उत्पन्न वाढ होते व त्यापायी सुद्धा आपण एखादे नवे आर्थिक ध्येय ठरवून नवी SIP सुरु करू शकतो !!

३. गुंतवणूक योग्य रक्कमेत वाढ झाल्यामुळे एखाद्या कुटुंबातील पती अथवा पत्नीच्या उत्पन्नात वाढ होते. परदेशी नोकरी मिळाल्याने अथवा गृहकर्ज फिटल्याने दरमहा गुंतवणूक योग्य रक्कम हाताशी शिल्लक राहाते. कुटुंबाच्या गुंतवणूक योग्य रक्कमेत ५० टक्कय़ांहून अधिक कायम स्वरुपाची वाढ झाल्यामुळे नवीन फंडाचा समावेश करणे योग्य होईल.

४ . जमीन किंवा मोठा खरेदी / विक्री व्यवहार झाल्यास हातात मोठी रक्कम येते व हि रक्कम liquid फंडात ठेवणे सुलभ असते.

या वाढीव गुंतवणूक योग्य रकमेमुळे जोखीम स्वीकारण्याची क्षमता वाढलेली असते किंवा वाढीव रकमेमुळे एखादे वित्तीय ध्येयाचा नव्याने समावेश झालेला असतो. मिड कॅप गुंतवणुकीत अधिक जोखीम असल्याने गुंतवणूक रक्कम कमी असल्यामुळे वित्तीय नियोजकाने मिड कॅप फंडांचा आधीच्या गुंतवणुकीत समावेश केला नसल्यास वाढीव गुंतवणूक योग्य रक्कमेमुळे नव्याने समावेश केला जाऊ  शकतो.

व ह्यासाठी मात्र सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा असे धनलाभ तर्फे सांगण्यात येत आहे .

अभिप्राय द्या!