नमस्कार
Mutual Fund विषयी चांगली माहिती तरी पाहून घ्या.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारचे सहभागाने युनिट ट्रष्ट औफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी. १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळालि. सद्या देशात 43 म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. पहिली बाब म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. आपल्या पैशानी मोठ काम कराव आणि ते तज्ञानी आपल्या वतीने करुन द्यावे असा तुमच्यासारखा विचार करणारे इतर अनेक गुंतवणूकदार तुमच्या सोबत असतात.

तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस या नावानेही ओळखले जाते. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो.

अभिप्राय द्या!

Close Menu