मुद्दल गमावण्याच्या भीतीपोटी अनेक वर्षे म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीकडे पाठ केलेल्या बचतदारांनी सुरुवात करताना, ‘डायनॅमिक’ धाटणीच्या रोखे योजनांचा पर्याय निवडणे श्रेयस्कर ठरते. म्युच्युअल फंडातील रोखे योजनांच्या अनेक प्रकारांतील हा नवगुंतवणूकदारांसाठी आदर्श पर्याय सांगितला जातो. विशेषत: काही वर्षांसाठी आपला बचतीचा पैसा सुरक्षितपणे गुंतवून ठेवण्याचा मानस असलेल्या गुंतवणूकदारांनी डायनॅमिक डेट फंडांची निवड करणे सुचविले जाते.
या वर्गवारीतील योजनांचा गेल्या वर्षभरातील परतावा हा सरासरी ९.६ टक्क्य़ांच्या घरात जाणारा आहे, जो मुदत ठेव योजनांच्या तुलनेत खूपच सरस परतावा आहे. तर या वर्गवारीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग टर्म प्लानने गेल्या कैक तिमाहीत सातत्यपूर्ण चांगला परतावा देऊन कामगिरीत वरचा क्रमांक मिळविला आहे. गेल्या वर्षभरातील तिचा परतावा हा ११.२० टक्के असून, तीन वर्षे, पाच वर्षे आणि सात वर्षे कालावधीतील परतावा अनुक्रमे १२.६० टक्के, १२ टक्के आणि ११ टक्के असा उमदा राहिला आहे. याच कालावधीत पारंपरिक गुंतवणूक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग टर्म प्लानने स्थापनेपासून १०.६० टक्के सरासरी परतावा दिला आहे,
UTI treasury advantage fund किंवा floating fund सुद्धा कमी कालावधीच्या गुंतवणुकीसाठी सुयोग्य निवड ठरते.