एसडब्ल्यूपी कशी चालते ?
एसडब्ल्यूपी या सुविधेद्वारे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनेतून ठराविक रक्कम काढता येते. ही रक्कम काढताना ती साधारणपणे दरमहिना किंवा तीन महिन्यांनी काढली जाते. अशी रक्कम काढून घेण्यासाठी पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य गुंतवणूकदाराला असते.

लाभांशाच्या पर्यायापेक्षा एसडब्ल्यूपी हा पर्याय कसा चांगला ?

नियमित उत्पन्न हवे असल्यास लाभांशाच्या पर्यायापेक्षा एसडब्ल्यूपी हा पर्याय अधिक भरवशाचा ठरतो. इक्विटी फंडाच्या लाभांश पर्यायात हा लाभांश नियमित मिळेल की नाही ते सांगता येत नाही. लाभांश हा भांडवल बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असतो, तसेच तो संबंधित मत्ता व्यवस्थापन कंपनीने (एएमसी) कमावलेल्या नफ्यावर अवलंबून असतो.
कर प्रणाली कशी आहे?इक्विटी व डेट फंडाच्या कररचनेप्रमाणेच एसडब्ल्यूपीसाठी रकरचना असते. त्यामुळे १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी इक्विटी फंडाचे युनिट्स स्वतःकडे ठेवल्यास त्यावर अल्पमुदतीचा भांडवली लाभ कर भरावा लागतो. डेट फंडासाठी युनिट्स ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवल्यास तसेच दीर्घकाळ ठेवल्यास भांडवली लाभ कर लागू होतो. याशिवाय गुंतवणूकदारांना संबंदित योजनेवर किती एग्झिट लोड आहे, याचाही मागोवा घ्यावा लागतो.

एसडब्ल्यूपी कशी सुरू करावी?

एसडब्ल्यूपी केव्हाही सुरू करता येते. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात केल्याबरोबरही एसडब्ल्यूपी सुरू करता येते. यासाठी तुम्हाला एएमसीकडे एक सूचनापत्र भरून द्यावे लागते. त्यामध्ये पोलिओ नंबर, पैसे काढण्याची नियमितता, प्रथम रक्कम काढून घेण्याचा दिनांक व बँक खाते क्रमांक द्यावा लागतो.

साधारणपणे ८% पर्यंत रक्कम swp मधून काढल्यास दहा ते १२ वर्षात मुद्दलही भरीवपणे वाढू शकते !!
ज्यांना दरमहा कायमस्वरूपी उत्पन्न आवश्यक असते त्यांनी swp हा पर्याय निवडणे अत्यंत सोयीस्कर आहे !!

अभिप्राय द्या!