विजय जोशी चा सप्रेम नमस्कार,

सद्यस्थितीमध्ये जनतेच्या अनेक बाबींसाठी आधार नोंदणी क्रमांक व आधार कार्ड मधील नोंदी महत्वाच्या, आवश्यक ठरतात. काही जणांना आधार कार्ड नवीन काढायचे असते तर काही जणांना पूर्वीच्या नोंदी बदलायच्या असतात. शासनांनी यासाठी अत्यल्प दर निश्चित केलेले आहेत. तथापि काही ठिकाणी ज्यादा पैसे आकारात असल्याच्या तक्रारी निदर्शनास आलेल्या आहेत. म्हणून त्याबाबत ही माहिती सर्वांसाठी देण्यात येत आहे.
आधार कार्ड नोंदणी करताना कोणताही नागरीक आधार केंद्रावर जातो त्यावेळी त्याला प्रथमत: एक अर्ज भरावा लागतो. अर्जामध्ये जी माहिती अर्जदाराने भरलेली आहे तीच सर्व माहिती आधार नोंदणी केंद्रचालक आपल्‍या संगणकावर नोंदवित असतो. सर्व माहिती संगणकावर नोंदविल्यानंतर पुन्‍हा एकदा निश्चितीसाठी नागरीकांना आधार नोंदणी केंद्रचालक ही माहिती दाखवितो तसेच त्‍यामध्‍ये काही चुक असल्यास त्या फेरबदल करतो नंतर त्याची प्रिंट काढतो व त्यानंतर हे दस्तऐवज व संबंधीतांचे बायोमेट्रीक्स ऑनलाईन अपलोड केले जातात.

आता ही सदरचा फॉर्म जेव्हा नागरीक भरतो किंवा आधार नोंदणी केंद्र चालकांकडून भरुन घेतला जातो तेव्हा नागरीकाने त्‍याची अधिकाधिक व अचूक माहिती सांगणे गरजेचे असते. यात संबंधीतांनी सांगितलेला पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, पॅनकार्ड नंबर वगेरे व्यवस्थीत भरले गेले की नाही याची खात्री करणे आवश्यक असते. नागरिकांची सदर माहिती देताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक देणे अत्‍यावश्‍यक असते जेणेकरुन आधार ऑथिरिटी काही प्रमाणात कोणत्याही नागरीकांच्‍या भ्रमणध्‍वनीवर संपर्क साधून आधार नोंदणी केंद्रावर त्‍यांनी केलेल्या आर्थिक बाबीबाबत उलट तपासणी करते. यामध्ये जर एखाद्या नागरीकाच्या झालेल्या चुकीच्या अर्थव्यवहाराबाबत माहिती दिल्यास त्या आधार नोंदणी केंद्रचालकाची चौकशी होऊन त्याला Blacklist देखील केले जाते.

आधार नोंदणी केंद्रावर गेल्यानंतर नागरीकाला आधार मधील बदलांसाठी काही ठराविक रक्कमशासन स्‍तरावरून ठरवून दिलेली आहे. यासंदर्भातील बॅनर / पोस्टर संबंधित आधार केंद्रावर लावण्यात आले आहेत. अशा प्रकारचे बॅनर / पोस्‍टर संबंधीत आधार नोंदणी केंद्रावर नसल्यास जिल्हा प्रशासनास नागरिकांनी लेखी कळविणे आवश्‍यक आहे.
CHARGES FOR AADHAR SERVICES

  • Particulars ==> Rate
  1. New Enrolment ==> Free

  2. Mandatory Biometric Update of Children ==> Free

  3. Other Biometric Update = 25/-

  4. Demographic Update
    (Name, Add., DOB, Mobile, Gender, Email) = 25/-

  5. Find Your Aadhar & B/W Printout = 10/-

6 Find Your Aadhar & Color Printout = 20/-

*अधिक पैसे देऊ नका. * जर आधार नोंदणी केंदचालक अधिक पैसांची मागणी करत असल्‍यास 1947 या टोल फ्री क्रमांकावर किंवा help@uidai.gov.in या संकेतस्‍थळावर संपर्क साधावा.
किवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संबंधित शासकीय नियंत्रण अधिकारी श्री बिजीतकर ( ८८५७०३२६७२ ) याच्याशी संपर्क साधावा.
पण त्याचबरोबर आधार नोंदणी सेवा सोडून इतर बाबी त्या केंद्रावरुन आपण घेत असल्यास त्या बाबतचे रितसर पैसे आपल्याला मोजावे लागणारच आहेत. इतर सर्विस घेतल्यास त्याची रितसर पावतीघेतल्यास कोणत्या आधार केंद्रचालकाने कोणत्या बाबीचे किती पैसे आकारले याबाबत पारदर्शकता येईल व जिल्हयातून कोणत्याही केंद्रचालकाकडून आधार कार्ड काढण्यासाठी जादा रक्कमेची मागणी केली असे होणार नाही.

शुभेच्छांसह,

आपला,

विजय जोशी,

निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

अभिप्राय द्या!