गुंतवणूकदारासाठी फंड व्यवस्थापक कसे काम करतो?
कंपनीची मूल्ये बदलल्यास किंवा तिच्या व्यवसायात काही बदल झाल्यास त्या कंपनीच्या भागांना फटका बसू शकतो. वैयक्तिक गुंतवणूकदाराचा विचार केल्यास, त्याच्याकडे त्याने खरेदी केलेल्या समबागाची वाटचाल कशाप्रकारे होत आहे हे पाहण्यास वेळ नसतो. अशा वेळी बाजारातील विचारांचा प्रभाव पडून गुंतवणूकदार निर्णय घेण्याची शक्यता असते. परंतु म्युच्युअल फंडांकडे तज्ज्ञ फंड व्यवस्थापक असतात, जे प्रत्येक कंपनीच्या वाटचालीवर नियमितपणे लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे फंड व्यवस्थापक कोणत्याही कंपनीचे भाग एकदम खरेदी करत नाही. प्रत्येक फंड व्यवस्थापकाला प्रत्येक समभागामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रात किती रक्कम गुंतवावी याचे बंधन असते. याचा दीर्घकाळात फायदा होतो.

 म्युच्युअल फंड किती रोकडसुलभ (लिक्विड) असतात?
प्रत्येक भाग (स्टॉक) दरवेळी रोकडसुलभ असेलच असे नाही. वाईट स्थितीत एखादा स्टॉक लोअर सर्किटमध्ये जाऊ शकतो, ज्यामुळे तुमची इच्छा असली तरीही तो तुम्हाला विकता येत नाही,तसेच अपर circuit लागल्यास फायदा सुद्धा खात्यात जमा होणे कठीण होऊ शकते .

 कोणते करलाभ मिळतात?
 गुंतवणूकदाराने एका वर्षाच्या आत त्याच्याकडचे समभाग विकले किंवा त्याने खरेदी केले तर त्याला अल्पमुदतीचा भांडवली लाभ कर भरावा लागतो. मात्र म्युच्युअल फंडात फंड व्यवस्थापकाकडून वेगवेगळ्या वेळी शेअर्सचे व्यवहार केले जातात. यात एखाद्या इक्विटी फंडात गुंतवणूकदार एक वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक करत राहिल्यास त्यापासून मिळणारे लाभ करमुक्त असतात. याचे कारण या गुंतवणुकीतून रोखे व्यवहार कर (एसटीटी) यापूर्वीच कापून घेतलेला असतो. नाही. त्याच्या उलट एखादा स्टॉक अपर सर्किटमध्येही जाऊ शकतो. रोकडसुलभतेच्या अशा प्रश्नांचा सामना म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना करावा लागत नाही.
यासाठी सामान्य गुंतवणूकदाराने आपली शेअर बाजारातील गुंतवणूक ही प्रथम म्युच्युअल फंडाद्वारेच करावी !!

अभिप्राय द्या!