आपल्या फ़ोलिओमध्ये नवीन फंडाचा समावेश करताना समान गुंतवणूक रणनीती असलेले फंड टाळणे हिताचे आहे .
उदाहणार्थ, आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाईन इक्विटी फंड असेल तर फ्रॅकलीन इंडिया ब्लूचीप फंडाचा समावेश करणे योग्य होणार नाही. किंवा गुंतवणुकीत आधीपासून एखादा डायनॅमिक बॉंड फंड असेल तर दुसरा डायनॅमिक बॉंडचा समावेश करण्यापेक्षा opportunity फंडाचा समावेश करणे योग्य धोरण आहे.
वाढत्या वयानुसार जोखीम स्वीकारण्याची क्षमता कमी होते. आधी रोखे व समभाग गुंतवणुकीचे प्रमाण ५०:५० असेल तर आता ते ६०:४० करण्याची आवश्यकता आहे. अतिरिक्त उपलब्ध झालेली रक्कम समभाग गुंतवणुकीऐवजी रोखे गुंतवणुकीसाठी वापरणे योग्य ठरते. अथवा समजा समभाग गुंतवणुकीने चांगला परतावा दिल्याने हे गुणोत्तर पूर्वपदावर आणण्यासाठी नवीन गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
असा अनुभव आहे की, गुंतवणूकदारांना नेहमीच अव्वल परतावा देणाऱ्या फंडात नवीन रक्कम गुंतवावीशी वाटते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, आज क्रमवारीत पहिल्या पाचात असलेला फंड आणखी दोन वर्षांंनी तीच क्रमवारी राखेल असे नाही. म्हणून परताव्याचे सातत्य राखणाऱ्या फंडाची निवड करणे अधिक योग्य होईल.
व यासाठी नव्याने दाखल होणारे NFO पाहणे सुरु ठेवून त्याचा अभ्यास करणे हिताचे होईल .
व यासाठी सामान्य गुंतवणूकदाराने चांगल्या सल्लागाराचा घेणे टाळू नये !!