बॅलन्स्ड फंड हे त्यांच्या रचनेप्रमाणे,  समभागांमध्ये ६५ टक्क्य़ांपर्यंत आणि उर्वरित रोखे पर्यायात गुंतवणूक करतात . यातून गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील वृद्धी सहभागाची संधी मिळतेच, तर ३५ टक्के हिस्सा हा रोख्यांमध्ये गुंतलेला असल्याने बाजार अस्थिरतेच्या स्थितीत जोखीम संतुलन सुनिश्चित केले जाते. समभाग आणि रोख्यांत योग्य संतुलन साधून, समभाग गुंतवणुकीसाठी ‘कॉन्ट्रॅरियन’ गुंतवणूक पद्धतीचे अनुकरण हे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंडाच्या लोकप्रियतेचे कारण आहे,

तसेच UTI balanced फंड सुद्धा सातत्याने १२ % ते १४ % वृद्धी देतो आहे !!

 

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंडाच्या प्रारंभापासून म्हणजे २ एप्रिल २००२ रोजी १०,००० रुपये गुंतवणुकीचे मूल्य १,२९,२६२ रुपये झाले असून, परताव्याचा दर १८.१० टक्के आहे.

अनेक फंड घराण्यांच्या बॅलन्स्ड फंड योजनांनी अलीकडच्या काळात वाढलेल्या गुंतवणूक ओघाने तब्बल १०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेची पातळी गाठली आहे. आयसीआयसीय प्रुडेन्शियन बॅलन्स्ड फंडाने ऑगस्ट २०१७ अखेर १६,३९४ कोटी रुपयांची एकंदर मालमत्ता गाठली. तर एचडीएफसी प्रुडन्स फंड आणि एचडीएफसी बॅलन्स्ड फंडानेही अनुक्रमे २९,१६९ कोटी व १३,८२४ कोटी रुपयांची मालमत्ता गाठली आहे. आदित्य बिर्ला सनलाइफ बॅलन्स्ड ९५ फंड, एसबीआय मॅग्नम बॅलन्स्ड फंडांनी मालमत्तेत गेल्या वर्षभरात १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

बँक FD द्वारे कमी झालेले व्याजदर पाहता कोणत्याही balanced फंडातील गुंतवणूक ही सर्व सामान्य गुंतवणूक दाराला चांगला परतावा देणारी एक सुंदर योजना आहे !!

This Post Has 4 Comments

  1. अतिशय उपयुक्त माहिती आहे. गुंतवणुकीबाबत सोप्या शब्दात मार्गदर्शन आपण केले आहे.

    1. धन्यवाद !!

    1. Thnks a lot !!

अभिप्राय द्या!

Close Menu