आपणास माहीतच आहे की, महागाई ही नेहमीच वाढत असते, दरवर्षी ती सरासरी ७ टक्के दराने वाढते आहे. हे गृहीत धरले तर ४० वर्षांनंतर आपणास दैनंदिन सुखी जीवनासाठी हवी असणारी रक्कम आताच्या तुलनेत ७ पट अधिक असायला हवी. वैद्यक शास्त्रामधील लक्षणीय प्रगतीमुळे भारतीय लोकांचे आयुष्यमान हे सरासरी वाढताना तर दिसते पण दुसरीकडे नवनवीन आजार डोकी वर काढत आहेत आणि त्यामुळे उपचाराचे खर्च वाढताना दिसतात. ते नजीकच्या भविष्यकाळात कमी होण्याची शक्यताही नाही. स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या सुखी व स्वावलंबी दिवसांसाठी आर्थिक नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज असून मुख्य म्हणजे हे आता आपल्याला कळू लागले आहे. पण तरीही आपण जी सरासरी बचत करतो त्यातून फक्त १२ टक्के रकमेची तरतूद ही निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाते.

आपणास आवश्यक असणारी भांडवल वृद्धी जर हवी असेल तर निवृत्तीनंतरच्या सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी, तरुण वयातच निवडावाअसा चांगला पर्याय म्हणजे

म्युच्युअल फंड हा होय !!

सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजारातील गुंतवणूक असा समज दिसून येतो. पण ते काही योग्य नव्हे. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक शेअरच्या बरोबरीने कर्जरोखे, मुदत ठेवी, सोने आदींमध्येसुद्धा असते. तरुण वयापासूनच, निवृत्तीनंतरच्या काळासाठी, नियमित गुंतवणुकीचा अतिशय योग्य असा पर्याय. गुंतवणूकदाराच्या विविध वयातील टप्प्यात आर्थिक उद्दिष्टे जशी बदलतात तशीच त्याची जबाबदारी, जोखीम घेण्याची क्षमता, होणारी बचत, इ. घटक देखील बदलतात. गुंतवणुकीचे पर्याय या विविध घटकांवर अवलंबून असतात. शेअर बाजार, रोखे, सोने, बँकेच्या ठेवी, मुच्युअल फंड, जमीन जुमला अशा विविध पर्यायांमध्ये योग्य पर्याय निवडणे हे खरे अर्थनियोजन आहे.

  • इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम्स (ईएलएसएस) हा म्युच्युअल फंडाचा प्रकार असून प्रामुख्याने गुंतवणुकीचा सर्वोच्च भाग शेअर बाजारात गुंतविला जातो. ‘ईएलएसएस’मधील गुंतवणूक मर्यादा तीन वर्षांची असून, ८० सी कलमाअंतर्गत ‘ईएलएसएस’मध्ये गुंतविलेल्या रकमेवर प्राप्तिकरातून वजावट मिळते तसेच मिळणारा परतावा व भांडवल वृद्धीवर कर सवलतही उपलब्ध होते. तरुण वयात निवडता येणारा हा एक योग्य पर्याय आहे.
  • गुंतवणुकीची उद्दिष्टे व जोखीम यांचा ताळमेळ, फंड घराणे, फंड व्यवस्थापकाबद्दल माहिती, फंडाची कामगिरी, फंड शुल्क रचना आणि खर्च यांचा अभ्यास करीत १०० हून अधिक म्युच्युअल फंडाच्या योजनेतील आपल्यासाठी योग्य अशा योजना निवडणे हे जरी काहीसे अवघड असले, तरीही थोडय़ा अभ्यासाने आणि योग्य आर्थिक सल्लागाराला जोडीला घेऊन अगदी सहज शक्य आहे.

– व्यावसायिक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, तुलनात्मकदृष्टय़ा कमी जोखीम, तरलता आणि पारदर्शकता या घटकांचा फायदा करून घेत तरुण वयातच सुरूकेलेल्या ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी’मुळे आपली आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे सोपे झाले आहे. यासाठी उद्दिष्टानुसार किमान ३ / ४ SIP द्वारे गुंतवणूक सुरु करणे , व त्यासाठी तज्ञ सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे हा एक चांगला मार्ग आहे !!

अभिप्राय द्या!