अजाणतेपणी आपल्याकडून काही देयके व कर्ज हप्ते भरणे विसरले जाते व त्यापायी खूप नुकसान होऊ शकते , ते टाळण्यासाठी इसीएस अथवा फोन रिमाइंडर आदी सुविधा उपलब्ध आहेत. पण हेही करणे राहून गेल्यास काय नुकसान होऊ शकते ते पाहू .

निर्धारीत तारखेला इन्शुरन्स प्रीमियम भरण्याचे लक्षात आले, नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी कंपनीकडून साधारणतः १५ ते ३० दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात येते. मात्र, त्यानंतरही प्रीमियम भरण्याचे राहून गेल्यास पॉलिसी रद्दबातल होण्याची शक्यता असते. पॉलिसी रद्द होऊन ​जितका काळ लोटला आहे, तितका अधिक प्रीमियम भरावा लागण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कालावधी उलटून गेल्यानंतर पॉलिसी पुन्हा सुरू ठेवायची असेल, तर पॉलिसी पुनरूज्जीवन शुल्कही (रिव्हायव्हल चार्जेस) वसूल करण्यात येते.

चुकून एखाद्या वेळी क्रेडिट कार्डची थकित रक्कम भरणे राहून गेल्यास तीन प्रकारचे मोठे आर्थिक धोके संभवतात. अ) तुम्हाला लेट पेमेंट फीसह थकित रक्कम भरावी लागते. ब) थकित रकमेवरील व्याज भरावे लागते. क) पुढीलवेळी तुम्ही केलेल्या खरेदीवर मूळ किमतीपेक्षा अधिक रक्कम भरावी लागते. तसेच आपला cibil अहवाल सुद्धा कमी होतो.

चार सदस्य असणाऱ्या कुटुंबाला दरमहा विविध कारणांस्तव किमान ६ ते ८ देयके द्यावी लागतात. त्यात मोबइल, वीज, इंटरनेट आदी देयकांचा समावेश होतो. ही सर्व देयके देण्याचे राहून गेल्यास ठरावीक दंडासह रक्कम भरण्याची वेळ ओढवू शकते.

कर्जाचे हप्ते हे दुधारी शस्त्र आहे. जर तुमच्याकडून चुकूनही एखादा गृहकर्जाचा अथवा वाहनकर्जाचा हप्ता भरण्याचे राहून गेल्यास केवळ दंडच नाही, तर तुमचा क्रेडिट स्कोअरही कमी होण्याची नामुष्की ओढावू शकते.

एचडीएफसी बँकेकडून घेतलेल्या पर्सनल लोनचा एक जरी हप्ता थकवला, तर द.सा. द. शे. २४ टक्के दराने हप्ता भरेपर्यंतच्या तारखेपर्यंत दंड वसूल केला जातो. आयसीआयसीआय बँकेचा गृहकर्जाचा हप्ता थकल्या ५०० रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

म्हणून post dated check द्यावेत . व जास्तीत जास्त बाबींना ECS सुविधा घेणे अत्यंत हितावह आहे !! व सर्वांनी “ओहो !! विसरलो!!!!” ह्यापासून मुक्ती मिळवावी !!!

 

This Post Has 2 Comments

  1. Sanjay yashwant joshi

    Correct.

    1. Pradeep Joshi

      Thanks !!

अभिप्राय द्या!