सणासुदीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘कार्ड पेमेंट‘ची सुविधा दिली जाते. त्यामागे ग्राहकांची सोय व्हावी व विक्रीत वाढ व्हावी, असा दुहेरी उद्देश असतो. ‘डेबिट’ वा ‘क्रेडिट’ कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या खरेदीत ‘ईएमआय’चा पर्यायही दिला जातो. मात्र, या पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी त्यांची सर्व माहिती करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप होण्याची  शक्यता असते.
हे लक्षात घ्याच
वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिची मूळ किंमत आणि कार्ड कंपन्यांद्वारे निर्धारित करण्यात आलेली किंमत यांचा आढावा घ्या.
‘ईएमआय’द्वारे वस्तू घेणार असाल, तर मूळ किंमत व व्याजासह आकारण्यात येणारी किंमत यांची तुलना करा. मूळ किमतीमध्ये बराचसा फरक पडत असेल, तर त्यात व्याज व प्रोसेसिंग फीचा समावेश करण्यात आल्याचे तुमच्या ध्यानात येईल.
एकाच शोरूम वा दुकानातून वस्तू घेण्यापूर्वी संबंधित वस्तूची अन्य ठिकाणी चौकशी करून किमती समजून घ्या. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय तपासून पाहावेत.
‘ईएमआय’चा पर्याय वापरून वस्तूच्या किमतीत मोठी वाढ होत असल्यास एकरकमी किंमत चुकविण्याचा पर्याय केव्हाही उत्तम.

क्रेडिट कार्डद्वारा वस्तूची खरेदी करीत असताना, तुमचे क्रेडिट लिमिट व अदा करावयाची रक्कम या​विषयी एकदा अवश्य खात्री करा.

‘ईएमआय’ योजना चांगली की वाईट

हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या गरजा आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालून घेण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते ‘ईएमआय’चा पर्याय तुमचा आर्थिक समन्वय बिघडविण्यास कारणीभूत ठरतो. वस्तूची विना ‘ईएमआय’ आणि ‘ईएमआय’सह किंमत पाहूनच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu