अजूनही अनेकांचा  पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून अत्यंत सुरक्षित राहण्याकडे कल असतो .पण NSC , PPF यापेक्षा सुद्धा खाली नमूद केलेली एक चांगली योजना थोडी दुर्लक्षित झालेली जाणवते.

सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (एससीएसएस)

व्याजदर : ८.३ टक्के
कालावधी : ५ वर्षे

टपाल खात्यातर्फे दिली जाणारी आणखी एक लोकप्रिय योजना…या योजनेमुळे निवृत्ती पत्करलेल्यांना उतारवयात चांगले उत्पन्न मिळू शकते. योजनेचा कालावधी पाच वर्षांसाठी असला तरी, त्यानंतर आणखी तीन वर्षे त्यात मुदतवाढ मिळू शकते. योजनेत गुंतवणुकीसाठी दरवर्षीची मर्यादा १५ लाखांची आहे. शिवाय ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांनाच योजनेत सहभागी होता येते. ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे किंवा सध्या कोणतेही काम करीत नाहीत, अशांना वयामध्ये दोन वर्षांची सवलत देण्यात आली आहे. या शिवाय लष्करातील निवृत्तांना कोणत्याही प्रकारची वयाची अट नाही. लष्करातील मंडळी वयाच्या साठीपूर्वीही योजनेत गुंतवणूक करू शकतात. तज्ज्ञांच्या मते ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय चांगली आहे. आउटलूक एशिया कॅपिटलचे सीईओ मनोज नागपाल यांच्या मते, ‘ही योजना नियमित उत्पन्न आणि चांगल्या परताव्याची हमी देणारी आहे. निवृत्त झालेल्यांची या योजनेला पसंती मिळत आहे.’

गेल्या तीन महिन्यांमध्ये रोख्यांमधील उत्पन्नात घसरण झाल्याने केंद्र सरकार अल्पबचत योजनांवरील व्याजदरात घट करील, असा कयास होता. जर अल्पबचत योजनांना ‘बाँड यिल्ड्स’वर जोडणाऱ्या फॉर्म्युल्याचा विचार केला तर, ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ अर्थात ‘पीपीएफ’वर सात टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता केंद्र सरकारने व्याजदर घटवण्याचा निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, आगामी काही तिमाहींमध्ये अल्पबचत योजनांवरील व्याजदरात घट होणार नाही. तरीही गुंतवणूकदारांनी डोळ्यांवर पट्टी बांधून अल्पबचत योजनांमध्ये कधीही गुंतवणूक करू नये.

व यासारख्याच  अधिक फायदा देणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी म्युच्युअल फंड सल्लागाराचा सल्ला घेण्यासाठी मागेपुढे पाहू नये.तसेच अशी माहिती घेवून आपली गुंतवणूक “CLEARFUNDS.COM या संकेतस्थळावरून शून्य broakarage देवून आपली आपण सुद्धा करू शकतो हेही ध्यानी घ्यावे !!!

अभिप्राय द्या!