इन्फोसिस ही कंपनी आपले समभाग आपणच विकत घेणार आहे . या किंवा अशा प्रकारच्या खरेदीला buy back  म्हणतात.

गुंतवणूकदाराला खरेदी केलेला शेअर बाजारामध्ये केव्हाही विकता येतो, पण कंपनीच जेव्हा ते शेअर परत विकत घ्यावयाचे ठरविते त्याला बाय बॅकम्हणतात. 

कसे केले जाते बाय बॅक?

कंपनी एका विशिष्ट किंमतीला, ठरावीक प्रमाणात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका विशिष्ट मुदतीत समभाग विकत घायचे ठरविते. जी किंमत ठरलेली असते ती किंमत इच्छुक गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होते आणि त्यांच्या डीमॅट खात्यातून ठरलेले शेअर्स वजा होतात.

गुंतवणूकदारांनी सर्व शेअर्स बाय बॅक केलेच (परत दिलेच) पाहिजेत असे बंधन नाही. परंतु जर या योजनेखाली शेअर्स विकायचे नसतील तर तसे स्पष्ट कळविले पाहिजे आणि अशी सूचना काही कंपन्या देतात. कंपनीकडून गुंतवणूकदारांना फॉर्म पाठविले जातात. फॉर्म व्यवस्थितरीत्या भरून गुंतवणूकदाराने ठरलेल्या मुदतीत, उल्लेख केलेल्या ठिकाणी ते जमा करणे आवश्यक असते. फॉर्म मिळाला नसेल तर हल्ली फॉर्म कंपनीच्या वेबस्थळावरून डाउनलोड करून भरता येतो.

इन्फोसिस आपली खरेदी ही १.११.१७ या दिनांकाला रु ११५० /- प्रती समभाग या दराने करणार आहे !!

हा निर्णय घेण्याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात .

 

  • व्यवस्थापनाचा / प्रवर्तकांचा भागभांडवलातील हिस्सा वाढवण्याकरता
  • दुसऱ्या कंपनीकडून अधिग्रहण (टेकओव्हर) केले जाण्याचा धोका टाळण्यासाठी
  • एखाद्या देशातून कंपनीला बाहेर पडायचे असेल तर
  • कंपनी बंद करायची असेल तर
  • ‘डीलिस्टिंग’च्या कायदेशीर बाबीतून सुटका करून घेण्यासाठी
  • कंपनीचे राष्ट्रीयीकरण होत असेल तर
  • बाय बॅक केल्यामुळे बाजारातील शेअर्सची संख्या कमी होते. त्यामुळे प्रति शेअर मिळकत (ईपीएस) वाढण्याची शक्यता असते.
  • त्यामुळे प्रत्येक buy back चा समभागधरकाने योग्य विचार करून आपला फायदा कशात आहे हे पाहावे !!

 

अभिप्राय द्या!