एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आज एम्के इमर्जिंग स्टार्स फंड हा तिस–या श्रेणीतील अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) लाँच केला.
सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने एम्के इमर्जिंग स्टार्स फंडाला मंजुरी दिली आहे आणि या फंडाचे प्राथमिक उद्दिष्ट भारतीय समभागांत पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली लाभ मिळवून देणे हे आहे. गेल्या साडेचार वर्षांत ईआयएमएलच्या फंड व्यवस्थापन विभागाने २५ टक्क्यांहून अधिक संयुक्त वार्षिक वाढ दराने (सीएजीआर) परतावा मिळवला आहे.
एम्के इमर्जिंग स्टार्स फंड हा पाच वर्षांसाठीचा मुदतबंद (क्लोज-एण्डेड) फंड असून दोनशे ते ३०० कोटी रुपयांदरम्यान निधी उभा करण्याचा वायदा यात आहे. बाजारातील भांडवलानुसार क्रमवारी ठरवण्यात आलेल्या १०० कंपन्यांपैकी पहिल्या ३०० कंपन्या ही या फंडांचा गुंतवणुकीची कक्षा (इन्व्हेस्टमेंट युनिव्हर्स) आहे. या कंपन्यांचे बाजारातील भांडवली मूल्य पाचशे कोटी ते पाच हजार कोटी असून त्यांनी यापूर्वी फंडांसाठी आकर्षक परतावा दिला आहे.