आयआयएफएल (इंडिया इन्फोलाइन) ग्रुपने सामान्य व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्यासाठी योग्य मार्ग निवडता यावा यासाठी ‘आयआयएफएल धन की बात’ या वित्तीय ज्ञान प्रदान करणाऱ्या पुढाकाराचे आज अनावरण केले.

एका संस्थेद्वारे विनामूल्य आर्थिक ज्ञान प्रदान करणारा हा भारतातील सर्वात मोठा उपक्रम आहे.  आयआयएफएलने  वृत्तपत्र, टेलिव्हिजन, संकेतस्थळ व प्रत्यक्ष कार्याद्वारे २०१८ पर्यंत ५ कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचे ध्येय ठेवले आहे .सध्या आयआयएफएलची सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध आहे.

आयआयएफएलचे सर्व व्हिडिओ आणि लेखा-जोखा http://dhankibaat.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यातील तज्ञांच्या मुलाखती झी न्युज चॅनलवर सोमवारी रात्री १० वाजता व शनिवारी दुपारी १.३० वाजता दर्शकांना पाहता येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन धन योजनेने ३० कोटी भारतीयांना बँकिंग प्रणालीमध्ये आणले, तरी लोकांना आर्थिक नियोजन व संपत्तीच्या निर्मितीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.

धन की बात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमावरून प्रेरित आहे. जसे रेडिओवरील कार्यक्रमांद्वारे विविध गोष्टींबाबत जनजागृती केली जाते तसेच आयआयएफएल आथिर्क स्वातंत्र्याबद्दल जनजागृती करू इच्छिते.

संपत्ती निर्माण करण्यासाठी कोणालाही खूप पैश्यांची गरज नसते. थोड्या पैश्यात देखील सुरवात करून परिमाणकारक आर्थिक नियोजन केल्यास २०-३० वर्षांनी त्याचे कोट्यावधी रुपयात रूपांतर करत येते. म्युच्युअल फंड, इक्विटी, कमोडिटी, बॉण्ड्स सारख्या गुंतवणुकीच्या पर्यायांची बहुतांश भारतीयांना माहिती नाही. धन की बात द्वारे उपलब्ध आणि सुरक्षित गुंतवणुकीद्वारे पैसे कसे कमवायचे हे शिकवण्यात येणार आहे.

धन की बात द्वारे पद्धतशीर गुंतवणूक योजना, लिक्विड फंड, विमा उत्पादने, कर्ज, गहाणखत, पर्यायी गुंतवणूकिंसारख्या विविध गोष्टी समजावून सांगण्यात येणार आहेत.

याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन धनलाभ तर्फे करण्यात येत आहे !!

This Post Has 2 Comments

अभिप्राय द्या!