You are currently viewing ‘ईएमआय’ योजना चांगली की वाईट?

 

सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी ‘ईएमआय’ हा प्रकार लोकप्रिय आहे. विशेषतः मोबाइल, लॅपटॉप व अन्य गॅजेट्सच्या संदर्भात ‘ईएमआय’चा सर्रास वापर करण्यात येतो. एखादे उत्पादन खरेदी केल्यानंतर ग्राहकाने त्याचा वापर करण्यास सुरुवात करावी. आणि तिचे देयक मात्र काही महिन्यांच्या समान रकमेत देण्याची सोय असते. अशा योजना ग्राहकांना भुरळ घालण्यात व वस्तूची खरेदी करण्यास भाग पाडू शकतात. मात्र, यामध्ये ग्राहकाचाच फायदा होतो, भेटवस्तू मोफत मिळतात, वस्तूची पूर्ण रक्कम विभागली गेल्यामुळे खर्चात बचत होते, असा ग्रह करून घेणे चुकीचे ठरते.

‘ईएमआय’ योजना चांगली की वाईट?

हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या गरजा आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालून घेण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते ‘ईएमआय’चा पर्याय तुमचा आर्थिक समन्वय बिघडविण्यास कारणीभूत ठरतो. वस्तूची विना ‘ईएमआय’ आणि ‘ईएमआय’सह किंमत पाहूनच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

यासाठी ही पद्धत वापरावी

  • वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिची मूळ किंमत आणि कार्ड कंपन्यांद्वारे निर्धारित करण्यात आलेली किंमत यांचा आढावा घ्या.
  • ‘ईएमआय’द्वारे वस्तू घेणार असाल, तर मूळ किंमत व व्याजासह आकारण्यात येणारी किंमत यांची तुलना करा. मूळ किमतीमध्ये बराचसा फरक पडत असेल, तर त्यात व्याज
  • व प्रोसेसिंग फीचा समावेश करण्यात आल्याचे तुमच्या ध्यानात येईल.
  • एकाच शोरूम वा दुकानातून वस्तू घेण्यापूर्वी संबंधित वस्तूची अन्य ठिकाणी चौकशी करून किमती समजून घ्या. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय तपासून पाहावेत.
  • ‘ईएमआय’चा पर्याय वापरून वस्तूच्या किमतीत मोठी वाढ होत असल्यास एकरकमी किंमत चुकविण्याचा पर्याय केव्हाही उत्तम.
  • क्रेडिट कार्डद्वारा वस्तूची खरेदी करीत असताना, तुमचे क्रेडिट लिमिट व अदा करावयाची रक्कम या​विषयी एकदा अवश्य खात्री करा.

अभिप्राय द्या!