ज्यांच्याकडे काही कालावधीसाठी काही रक्कम विनावापर असते त्यांनी लाभ मिळविण्यासाठी अत्यल्प (अल्ट्रा शॉर्ट) मुदतीचे फंड वापरावेत !!

अत्यल्प (अल्ट्रा शॉर्ट) मुदतीचे फंड हे डेट फंड असतात. हे फंड कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट व कॉर्पोरेट पेपर यांतून गुंतवणूक करतात. या फंडांचा सरासरी मुदतपूर्ती कालावधी ९१ दिवसांपेक्षा अधिक असतो. साधारणतः १८ महिन्यांच्या कालावधीने मुदतपूर्ती होणाऱ्या रोख्यांमध्ये या फंडाचे पोर्टफोलिओ गुंतवणूक करतात.

अत्यल्प मुदतीचे फंड वेगळे कसे?

लिक्विड फंड हे एक दिवस ते तीन महिने इतक्या कमी कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी असतात. त्यांच्याकडे डेट साधनांचा पोर्टपोलिओ असतो. या गुंतवणूक साधनांचा मुदतपूर्ती कालावधी ९१ दिवसांपेक्षा अधिक नसतो. यामध्ये रोख्यांवर व्याज मिळते व यात चढउतार फारसा होत नाही. अत्यल्प मुदतीचे फंडही अशा साधनांतूनच उत्पन्न मिळवतात.
परंतु या फंडांचा मुदतपूर्ती कालावधी लिक्विड फंडांपेक्षा अधिक असतो. त्यांच्याकडे असलेल्या गुंतवणूक साधनांच्या किंमतीत किंचित चढउतार होऊ शकतो.

अत्यल्प मुदतीच्या फंडांचा कशा प्रकारे वापर केला जातो?

इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक परंतु, बाजाराची दिशा ओळखता न येणाऱ्या तसेच बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांना अत्यल्प मुदतीच्या फंडांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे इक्विटीमुळे धास्तावलेले गुंतवणूकदार आपला नफा पार्क करण्यासाठी अत्यल्प मुदतीच्या फंडांचा उपयोग करतात. एसटीपीसाठी अत्यल्प मुदतीचे फंड वापरण्याचा सल्लाधनलाभ तर्फे दिला जातो . अत्यल्प मुदतीच्या फंडांत केलेल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळू शकतो.

एग्झिट लोड असतो का?

बहुतांश फंडांसाठी एग्झिट लोड नसतो.

current खाते किंवा बचत खात्यात विनावापर पडलेली रक्कम अल्प मुदतीसाठी  सुद्धा आपण अश्या फंडमध्ये ठेवून आपण जादा लाभ पदरात पाडून घेवू शकतो !! यासाठी  अधिक माहिती हवी असल्यास शेरखान कार्यालयाशी संपर्क साधावा !!

अभिप्राय द्या!