केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबाबत (एनपीएस) महत्त्वाची घोषणा केली आहे. आता एनपीएसमध्ये वयाच्या पासष्टीपर्यंत गुंतवणुकीची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. याचा आता बिगर सरकारी आस्थापनांतील कर्मचारी, खासगी आणि अनौपचारिक क्षेत्रातील पगारदार तसेच स्वयंरोजगार करणाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित निवृत्तीलाभासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.

‘एनपीएस’ योजनेसाठी वयोमर्यादा किमान 18 ते 60 वर्षापर्यंत असते. आता पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)ने घेतलेल्या निर्णयानुसार आता 65 व्या वर्षांपर्यंत ‘एनपीएस’मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

अभिप्राय द्या!