ऑनलाइन माध्यमातून ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ व्यवहार करणाऱ्यांना कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने घेतला आहे. याचा लाभ बँकेच्या ग्राहकांना १ नोव्हेंबरपासून घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेने अन्य सेवांची शुल्क फेररचना केली आहे. त्यानुसार धनादेश निगडित व्यवहार अधिक महागडे ठरणार आहेत. याचीही अंमलबजावणी मात्र येत्या महिन्यापासून होणार आहे.

नोटाबंदीची वर्षपूर्ती होत असताना डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले  आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu