बॅलन्स्ड फंड हा हायब्रीड फंडाचा एक प्रकार आहे. हे फंड इक्विटी व डेट अशी मिश्र गुंतवणूक करतात. इक्विटी केंद्रीत बॅलन्स्ड फंडांमध्ये इक्विटीचे प्रमाणा ६५ ते ७५ टक्के असते. उर्वरित गुंतवणूक डेट प्रकारात असते. निव्वळ इक्विटी फंडाच्या तुलनेत यांचे जोखमीचे प्रमाण कमी असते. म्युच्युअल फंडांत प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला  व्यवस्थापक  देतात.

कार्यपद्धती

यामधील इक्विटी हा घटक दीर्घकालीन परतावा देतो तर डेट घटक तुमच्या पोर्टफोलिओला स्थैर्य देतो. यामुळे इक्विटी किंवा डेट यापैकी कोणालाही भांडवल बाजार घसरण्याता फटका बसला तरी गुंतवणूकदारांना जोखीम उचलावी लागत नाही. बाजार वरच्या दिशेने वाटचाल करत असताना फंड व्यवस्थापकांना कमाल पातळी स्थिर ठेवण्यासाठी इक्विटी विकावी लागते. बाजार पडलेला असताना हीच पातळी राखण्यासाठी फंड व्यवस्थापक इक्विटी खरेदी करतो. ही रचना गुंतवणूकदारांच्याफायद्याची ठरते .

कर रचना

६५ टक्क्यांपेक्षा अधिक इक्विटीचा भरणा असलेल्या बॅलन्स्ड फंडांना इक्विटी फंडांप्रमाणे कर लागू होतो. या फंडात गुंतवणूक कायम ठेवण्याचा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक झाल्यास या फंडांतील गुंतवणूक करमुक्त होते. अन्यथा त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. अनेक गुंतवणूकदार अशा फंडांसाठी लाभांशाचा पर्याय निवडतात. लाभांश हा करमुक्त असल्यामुळे (त्यावर लाभांश वितरण कर लागत नसल्यामुळे) हा पर्याय निवडला जातो. नव्या कायद्यानुसार आता ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी डेट फंडात रक्कम ठेवल्यास त्यावर कर लागू होतो. अशावेळी बॅलन्स्ड फंड हा उत्तम पर्याय ठरतो. कारण या फंडात सर्व डेट होल्डिंग, या फंडात एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी रक्कम ठेवल्यास, करमुक्त आहे.

 

SWP साठी कोणत्याही AMC चा बॅलन्स्ड फंड चांगला असतो !!

अभिप्राय द्या!