कट-ऑफ टाइम
म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार युनिट खरेदी करतात, युनिट विकून त्यांचे पैसे घेतात किंवा एका योजनेकडून दुसऱ्या योजनेकडे युनिट फिरवतात (स्विच करतात) त्यावेळी या प्रत्येक युनिटची किंमत म्हणजेच निव्वळ मत्ता मूल्य (एनएव्ही) होय.
एखादा व्यवहार करण्यासाठी कोणत्या वेळी विनंती करण्यात येते त्यावर त्या युनिटची एनएव्ही अवलंबून असते. एनएव्ही मिळण्याची वेळ म्हणजेच कट-ऑफ टाइम होय. लिक्विड फंड, डेट फंड व इक्विटी फंड यांच्यासाठी कट-ऑफ टाइम वेगवेगळा असतो.
लिक्विड फंडांसाठी अन्य फंडांपेक्षा वेगळा कट-ऑफ टाइम असतो. दुपारी दोन वाजेपर्यंत होणाऱ्या गुंतवणुकांसाठी युनिट्सचे वाटप आधीच्या दिवसाच्या एनएव्हीनुसार केले जाते. यामुळे आधीच्या दिवसाची एनएव्ही मिळणारे केवळ लिक्विड फंडच असतात. दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे काढून घेतल्यास त्यासाठी त्या दिवसाची एनएव्ही युनिट्सना लागू होते. मात्र ही रक्कम दुसऱ्या दिवशी सकाळी बँक खात्यात जमा केली जाते.
इक्विटी व डेट फंडांसाठी कट-ऑफ टाइम
या फंडांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत येणाऱ्या विनंतीसाठी कट-ऑफ टाइम मिळतो. तुमचा अर्ज दुपारी तीन वाजण्याआधी आल्यास तुम्हाला त्याच दिवसाचा एनएव्ही मिळतो. हा अर्ज
तीन वाजल्यानंतर आल्यास पुढच्या दिवसाचा एनएव्ही मिळतो. हे नियम दोन लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या व्यवहारांना लागू होतात.