गुंतवणूकदार म्हणून आपण आर्थिक विश्वात उतरत असू तर, आर्थिक विश्लेषकांकडून वापरल्या जाणाऱ्या आर्थिक संज्ञांचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आर्थिक संकल्पनाही कळणे गरजेचे आहे.
यामध्ये प्रामुख्याने EQUITY , DEBT, PROFIT, LOSS,depreciation या शब्दाबरोबरच गुंतवणुकीच्या अनेक शब्दांच्या भाषा कळणे अत्यावश्यक आहे !!
यासंदर्भातील काही मुद्दे पहा !!
कामकाजातून मिळणारे उत्पन्न
आर्थिक अहवालातील हा सर्वात महत्त्वाचा घटक. कंपनीच्या विविध कामकाजांमधून मिळणारा एकूण महसूल या घटकामुळे आपल्याला कळतो. उत्पादन करणाऱ्या व व्यापार करणाऱ्या संस्थांनी केलेली विक्री यातून कळते तर, सेवा देणाऱ्या संस्थाच्या बाबतीत सेवा दिल्याबद्दलचा मोबदला यातून कळतो. या घटकावरून कंपनीचा आकार कळतो. कंपनी दोन प्रकारच्या कामकाजामध्ये सक्रिय असेल तर, त्या प्रत्येक प्रकाराचा आकार यातून समजून येतो. कंपनी उत्पादनात किंवा अनेक उत्पादनांच्या व्यापारात सक्रिय असेल तर तिचा आवाका आपल्या लक्षात येतो आणि मग आपल्याला या कंपनीचे भवितव्य कसे असेल त्याचा अंदाज घेता येतो.
एका चांगल्या प्रकारे चालवल्या गेलेल्या कंपनीसाठी कामकाज उत्पन्नापेक्षा अन्य उत्पन्न हे खूपच कमी असते. समजा, अन्य उत्पन्न हे कामकाज उत्पन्नापेक्षा अधिक होऊ लागले तर ही बाब त्या औद्योगिक क्षेत्रात चलनघट (रिसेशन) आल्याचे किंवा त्या क्षेत्राने कामकाज कमी केल्याचे निदर्शक असते.
उत्पादक कंपन्यांसाठी नफा व तोटा खात्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. विक्रीच्या तुलनेत कच्चा माल वाढत गेल्यास कंपनीच्या नफ्याच्या प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता वाढते. एखादी कंपनी कृषीमाल तिच्या उत्पादनासाठी वापरत असेल तरी मान्सूनमुळे कृषीमालाच्या किमतींत मोठे चढउतार दिसून येतात. त्यामुळे कच्च्या मालाचे स्वरूप आणि उत्पादनातील तसेच किमतीतील चढउतार समजून घेताना आपल्याला याचा उपयोग होतो.
कर तरतूद
कंपनीच्या उत्पन्नावर किती कर भरायचा आहे हे यातून कळते. करपूर्व नफ्याशी याचे प्रमाण कमी असेल व तसे ताळेबंदात दाखवले असेल तर याचा अर्थ कंपनीने योग्य प्रकारे करनियोजन केले आहे.
कोणत्याही कंपनीच्या आर्थिक अहवालात वर उल्लेख केल्याशिवायही अनेक मुद्दे असतात. परंतु वरील सर्व घटक हे महत्त्वाचे आहे. हे घटक समजून घेतल्यास गुंतवणूकदार जागरुकपणे गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकेल.
किंवा यासंदर्भात कोणाचाही सल्ला घेण्यापेक्षा स्वतः अभ्यास करणे सुद्द्धा हितावह असते !!
Nice