म्युच्युअल फंडांतील गुंतवणुका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक फंडाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागेल किंवा प्रत्येक फंडाशी संपर्क साधून हे काम करावे लागेल. तुम्ही अशी जोडणी निबंधक (रजिस्ट्रार) स्तरावरही करू शकता. सीएएमएस (कॅम्स), कार्वी, फ्रँकलिन टेम्पल्टन व सुंदरम बीएनपी पारिबा या संस्था रजिस्ट्रार म्हणून काम करतात. या रजिस्ट्रारकडे असलेल्या म्युच्युअल फंडांतील गुंतवणुका आधारशी जोडण्यासाठी या संस्था काम करतात. अशा म्युच्युअल फंडांतून तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला या रजिस्ट्रारचा उपयोग करता येतो. एकाच रजिस्ट्रारकडे असलेल्या दोन म्युच्युअल फंडांमध्ये तुमची गुंतवणूक असेल तर त्या रजिस्ट्रारकडे तुम्हाला एकदाच आधार जोडणी करावी लागेल. त्याचवेळी जर तुमची गुंतवणूक दोनपेक्षा अधिक रजिस्ट्रारच्या अंतर्गत येत असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक रजिस्ट्रारकडे जाऊन आधार जोडणी पूर्ण करावी लागेल. हे काम ऑफलाइन करायचे असेल तर, संबंधित रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर जाऊन आधार संलग्नतेचा अर्ज डाउनलोड करावा. हा अर्ज भरून, त्यासोबत तुमचा फोलिओ क्रमांक देऊन, स्वसाक्षांकित आधार प्रत देऊन जोडणी प्रक्रिया पूर्ण करावी.

तुमचा मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असेल तर, तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही ऑनलाइन आधारशी जोडता येईल. यासाठी तुम्ही रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर जा, तुमचा पॅन व आधार क्रमांक भरा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाइलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल. तो पासवर्ड भरल्यानंतर आधार क्रमांक म्युच्युअल फंड गुंतवणुकीशी जोडला जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचा ईमेल तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रारकडून येईल.

दिनांक ३१ डिसेंबर २०१७नंतर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबरोबर आधार संलग्न न केल्यास ती गुंतवणूक गोठवावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.म्हणून सर्वांनी याकडे गंभीरपणे पाहावे हि विनंती !!

This Post Has 2 Comments

  1. Sir, पण online Folio no. कसा मिळवावा?
    आणि 50k च्या वर लागणाऱ्या गुंतवणूकिसाठी लागणारे CKYC रेजिस्ट्रेशन online कसे करता येईल?

    1. CKYC physicaly करावे लागते ! माझ्याकडे form आहे ! त्यानंतर OTM ( one time mandate )द्वारे आपण कोणतेही व्यवहार online करू शकतो.
      प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!

Close Menu