आसाम येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी कररचनेत महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आणि 24 राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत गुवाहटी येथे आज जीएसटी परिषदेची बैठक झाली. त्यानुसार दैनंदिन वापरातील 177 वस्तूंवरील जीएसटी आता 18 टक्के करण्यात आला आहे. जो याआधी 28 टक्के आकारला जात होता.

मोदी सरकारच्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिला वर्गाला आजच्या निर्णयाचा विशेष फायदा होणार आहे. कारण जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये डिओ, शॅम्पू आणि सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. मात्र चैनीच्या गोष्टींवरील जीएसटीचा दर सरकारने 28 टक्के कायम ठेवला आहे. 28 टक्के वस्तुंच्या यादीत तंबाखू, सिगारेट आणि चैनीच्या गोष्टींचा समावेश आहे.

अभिप्राय द्या!