म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

एक दिवस ते अनेक वर्षे अशा विविध कालावधीसाठी गुंतवणूक करण्याकरता अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. वित्त बाजार, सरकारी रोखे (जी-सेक), इक्विटी, हायब्रिड अशा प्रकारांतील म्युच्युअल फंड योजना उपलब्ध असतात. म्युच्युअल फंडांमध्ये किमान ५०० रुपये तर कमाल कितीही गुंतवणूक करता येते. तुम्ही यामध्ये ऑनलाइन, ऑफलाइन, फंड हाउसकडे थेट पद्धतीने किंवा एखाद्या प्रतिनिधीमार्फत गुंतवणूक करू शकता.

पैसे काढणे

खुल्या फंडांच्या बाबतीत पैसे काढून घेण्यासाठी कोणत्याही कामकाज दिवसात अर्ज करता येतो. असा अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक ते पाच दिवसांत पैसे मिळू शकतात. म्युच्युअल फंडांच्या काही योजनांमधून तुम्ही दोन लाख रुपयांपर्यंत पैसे वर्षात कोणत्याही वेळी काढू शकता.

सुरक्षितपणा

म्युच्युअल फंडांच्या बाबतीत तुम्ही तिथे गुंतवलेला पैसा हा व्यावसायिक फंड मॅनेजरच्या ताब्यात असतो, ज्याचे बाजाराकडे लक्ष असते आणि जो तुमच्यासाठी चांगल्या उत्पन्नाच्या संधी शोधत असतो. अॅम्फी संघटना किंवा म्युच्युअल फंडाची वेबसाइट येथे प्रसिद्ध होणारी एनएव्ही ही तुमच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाची असते. याशिवाय फंड हाउस एक मंथली फॅक्ट शीट प्रसिद्ध करतो.

One TimeMandate form भरल्यावर तर सर्व व्यवहार smart phone मधील app द्वारे सुद्धा घरबसल्या करता येतात !!

तसेच या सर्व व्यवहारावर SEBI ची योग्य नजर सुद्धा असते!!

 

अभिप्राय द्या!