online व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी ते थोडक्यात पहा !!

पासवर्ड

  • तुमच्या खात्याची माहिती कधीही सेव्ह करू नका, यात खाते क्रमांक, क्रेडिट आणि डेबिट कार्डांचे पिन क्रमांक कधीही मोबाइल, लॅपटॉप किंवा आय-पॅडवर अथवा कार्डाच्या क्व्हरवर सेव्ह करू नका.
  • अनधिकृत वापर टाळण्यासाठी तुमचा फोन नेहमी लॉक असू द्या.
  • तुमचा पासवर्ड सहज ओळखता येणार नाही असा असावा, यात मुळाक्षरे आणि क्रमांक यांचे समीकरण हवे आणि विविध खात्यांना विविध पासवर्ड वापरा. ते लिहून ठेवू नका.
  • तुमच्या ब्राउजरमधून `ऑटो कम्प्लिट’ प्रक्रिया काढून टाका.
  • तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलसाठी नेहमी पॉवर ऑन / अॅक्सेस पासवर्ड वापरा तसेच स्क्रीनसेव्हर पासवर्ड वापरा, यामुळे तुमची यंत्रणा तुमच्या परवानगी शिवाय कुणीही वापरू शकणार नाही.

 सुरक्षितता

  • मोबाईल बँकिंग अॅप नियमितपणे नवे व्हर्जन आल्यास / अपग्रेड झाल्यास अपडेट करा. नेहमी अधिकृत अॅप्लिकेशन वापरा, कधीही रन-डाउन व्हर्जन वापरू नका.
  • फायरवॉल आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि तो नेहमी अपटेड करत राहा, यामुळे धोकादायक सॉफ्टवेअर डिलिट करणे किंवा नाहीसे करण्यासाठी मदत होते. सुरक्षिततेचा प्रोग्रॅम किंवा अँटीव्हायरस नियमितपणे अपटेड करत राहा.
  • आपल्या खात्यावरून नेहमी लॉग ऑफ करा आणि काम पूर्ण झाल्यावर ब्राउजर बंद करा.
  • व्यववहारांचे एसएमएस आणि ईमेल आणि ओटीपी नेहमी तपासत राहा आणि तुम्ही न केलेल्या व्यवहाराचे अलर्ट आल्यास बँकेला तातडीने कळवा.

 अनोळखी ठिकाणाहून आलेली लिंक टाळा

  • इतरांचे कॉम्प्युटरवर आणि रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि सायबर कॅफे अशा सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट बँकिंग वापरणे टाळा.
  • अनोळखी ठिकाणाहून (थर्ड पार्टी) आलेली लिंक किंवा ईमेल उघडणे टाळा.
  • अनोळखी स्रोतांकडून आलेली अॅप कधीही डाउनलोड करू नका.
  • टेलिमेकर्स किंवा कॉलर्सना आपल्या खात्याची कुठलीही माहिती देऊ नका, अगदी त्यांनी तुमच्या खात्याची पडताळणी करायची आहे असे सांगितले तरीही.

 तुमच्या बँकेशी वेळोवेळी संपर्कात राहा

  • तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचा संशय आल्यास बँकेला तातडीने माहिती द्या किंवा किमान कामाच्या तीन दिवसांमध्ये तरी कळवाच, ज्यामुळे तुमच्या तक्रारीची योग्य नोंद घेतली जाईल.
  • तुमच्या मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी किंवा पत्ता यामध्ये काही बदल झाल्यास तातडीने बँकेला कळवा.
  • डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास बँकेला तातडीने माहिती द्या किंवा तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होऊ नयेत म्हणून ते हॉटलिस्ट करून घ्या.
  • तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास बँकेला ताबडतोब कळवा.

 नियमित तपासणी

आपल्या खात्यातील बाकीवर आणि भूतकाळात केलेल्या व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवा.

आताच्या आधुनिक युगात जुन्या पद्धतीच्या बँक व्यवहारांचे दिवस संपलेत. बँक क्षेत्र जितक्या जास्त प्रमाणात डिजिटल तंत्राने पुढे जाईल, आपली अत्याधुनिक उत्पादने ग्राहकांना 24×7 तांत्रिकदृष्ट्या पुरवेल आणि विविध श्रेणीतील सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देईल, तितक्याच वाढत्या प्रमाणात डिजिटल आणि नेट बँकिंग फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

भारत सध्या रोकड-रहित अर्थयंत्रणेकडे वाटचाल करत आहे, यामध्ये ग्राहकांनी वैयक्तिक पातळीवर आपल्या देयकांच्या यंत्रणांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे – यामुळे डिजिटल बँक सेवांचा अधिक चांगल्या प्रकारे आणि सुलभतेने आनंद घेता येणार आहे.

अभिप्राय द्या!