मी अनेक नोकरदार / छोटे व्यावसायिक यांच्याशी कर बचतीसम्बंधात आपण काय करता ? हे विचारतो तेव्हा PPF, NSC, यापेक्षा वेगळे उत्तर मिळत नाही. १०० जणांना विचारतो तेव्हा एखाद दुसरा मनुष्य सुकन्या समृद्धी संबंधात सांगतो , पण ELSS ही म्युच्युअल फंड आधारित योजना अनेकांना समजलेलीच नाही हे जाणवते म्हणून हे वाचाच !!
ईएलएसएस योजना काय आहे?
ईएलएसएस ही म्युच्युअल फंड योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास कर वाचवता येतो. ईएलएसएस फंड पूर्णतः भांडवल बाजारात पैसा गुंतवता, ज्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळवता येते. परंतु, ईएलएसएसमध्ये भांडवल बाजारातील धोके असतात आणि त्यामुळे निश्चित परताव्याची हमी देता येत नाही.
ईएलएसएसमध्ये गुंतवणूक कशी करावी?
एसआयपीद्वारे ईएलएसएसमध्ये मोठी गुंतवणूक आपण करू शकतो. एसआयपी पर्याय निवडल्यास ठराविक रक्कम तुमच्या बँक खात्यातून दरमहिना ईएलएसएसमध्ये टाकली जाईल. तुम्ही ५०० रुपये इतकी कमी एसआयपी करू शकता. एसआयपी पर्यायामध्ये तीन वर्षांचा लॉकइन कालावधी असतो.
ईएलएसएसचे फायदे कोणते?
ईएलएसएसचा लॉकइन कालावधी तीन वर्षांचा असतो. त्या तुलनेत सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीकरता (पीपीएफ) किमान १५ वर्षांचा लॉकइन कालावधी असतो. या काळात पैसा काढावा लागल्यास तो सशर्त काढण्यास परवानगी दिली जाते. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीकरता तुमच्या नोकरीच्या वर्षांचा लॉकइन कालावधी असतो. करबचत करणाऱ्या मुदत ठेवी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यांचा लॉकइन कालावधी पाच वर्षे किंवा अधिक असतो. न्यू पेन्शन योजनेमध्ये तुम्ही ६० वर्षे वयाचे होईपर्यंत पैसा अडकून राहतो. या योजनेतून काही अटींवर पैसे मध्येच काढता येतात. या पार्श्वभूमीवर, ईएलएसएसमध्ये पैसे काढताना तसेच लाभांश यावर तुम्हाला कोणताही कर द्यावा लागत नाही.
म्हणून यावर्षी तरी मार्ग बदलून ELSS चा मार्ग पहाच हे नम्र आवाहन !!