सध्या बाजारात अनेक NFO वेगवेगळे investment प्लान घेवून आले आहेत , तसेच डिसेंबर नंतर करबचतीच्या अनेक योजना येतील पण गुंतवणूकीपुर्वी खालील बाबी पाहणे , तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे केव्हाही चांगले आहे !!

महत्त्वाचे मुद्दे

  • गुंतवणूक ही सर्वासाठी महत्त्वाची आहे. इथे स्त्री, पुरुष, अविवाहित, विवाहित, घटस्फोटित, एकेरी पालक, तरुण, मध्यमवयीन, वयस्क असा काही भेदभाव नसतो.
  • खूप वाचन करा आणि स्वत:ला आर्थिक नियोजनात हुशार करा. इंटरनेटवर खूप माहिती आहे. योग्य प्रश्न विचारला की उत्तर सापडते.
  • सल्ला घ्या, पण सर्व शंकांचे समाधान झाल्यावरच त्यावर अंमल करा. एकाचा सल्ला दुसऱ्यासाठी लागू पडेल असे नेहमीच होत नाही.
  • पैशाकडे लक्ष द्या, आपल्या मुलाकडे देता तसे. आपला पैसा ही आपली जबाबदारी आहे. त्या संदर्भात घेतलेले निर्णय हे पूर्णपणे आपले असतात, म्हणून काळजीपूर्वक व्यवहार करा.
  • वेळोवेळी आपली गुंतवणूक तपासा. त्यामुळे वेळीच नुकसान थांबवता येते.
  • आर्थिक नियोजन कुटुंबाचे आहे, एकटय़ा नवऱ्या किंवा बायकोचे नाही. तेव्हा मुलांनाही योग्य पद्धतीने त्यात सहभागी करा.
  • व योग्य निर्णय घेवून उद्दिष्ट्पुर्तीकडे वाटचाल करा !!

अभिप्राय द्या!