पैशाच्या वाटा मुख्य दोन प्रकारच्या असतात. येणाऱ्या पैशांच्या आणि जाणाऱ्या पैशांच्या. बहुतेक वेळा येणारे पैसे एकाच मार्गाने येत असतात; मात्र जाणाऱ्या पैशांना अनेक वाटा असतात. अशा वेळी येणारे पैसेदेखील एकापेक्षा जास्त मार्गाने कसे येऊ शकतील, याचा विचार केला पाहिजे.

साधारणतः प्रत्येकाचे पैसे बऱ्याचदा बॅंकेच्या बचत खात्यात किंवा मुदत ठेवीत असतात. जोपर्यंत ठेवींवरील व्याजाचा दर 9-10 टक्के होता, तोपर्यंत फारसा प्रश्‍न नव्हता. पण आता या व्याजदरात बरीच घसरण होऊन ते 6 ते 7 टक्‍क्‍यांवर आले आहेत. बचत खात्यावरदेखील जेमतेम 4 टक्के व्याज मिळते. अशा वेळी बॅंकेत पैसे ठेवणाऱ्यांनी आपले व्याजाचे उत्पन्न, मुद्दल न वाढविता कसे वाढविता येईल, याचा विचार केला पाहिजे. काही बॅंका या प्रश्‍नाचे उत्तर “फ्लेक्‍झी स्कीम’च्या माध्यमातून देऊ शकतात. या योजनेखाली बचत खात्यातून “फ्लेक्‍झी’ योजनेत पैसे वर्ग केले तर जास्त व्याज मिळू शकते. बचत खात्यात कमी दराने पैसे ठेवण्यापेक्षा या योजनेत पैसे वर्ग केले तर एक-दीड टक्का व्याज जास्त मिळू शकते. शिवाय या योजनेत दरमहा व्याज देण्याची सोय असते. बचत खात्यात ठराविक रकमेच्या पुढील रक्कम “फ्लेक्‍झी स्कीम’मध्ये आपोआप वर्ग केली जाते. दरम्यानच्या काळात जास्त रकमेचा चेक द्यायचा असल्यास या “फ्लेक्‍झी स्कीम‘मधून बचत खात्यात पैसे उलटे वर्ग केले जातात. त्यामुळे अडचण येण्याची शक्‍यता नसते. बचत खात्यात कमी दराने पैसे पडलेले असतात. त्यांना ही योजना उपयोगी पडू शकेल. तसेच रिकरिंग डिपॉझिट या योजनेतसुद्धा बचत खात्यातून ठराविक रक्कम जास्त दराने वर्ग करता येते. वर्ग झालेल्या रकमेवर अडचणीच्या वेळेला कर्ज काढता येते. मुदतीपूर्वी पैसे हवे असल्यास व्याजाचा दर कमी होतो, इतकेच. या योजनेमुळे गुंतवणूकदाराला आपले व्याजाचे उत्पन्न वाढविता येऊ शकेल.

तसेच BSE Star या म्युच्युअल फंडासंबंधी व्यवहार करणाऱ्या plaltfom वर तर काही दिवस / काही आठवडे /काही महिने सुद्धा अधिक व्याज देणाऱ्या DEBT योजनामध्ये अत्यंत कमी वेळात व कोठेही न जाता पैसे गुंतवण्याची सुविधा आहे. इच्छुक काहीही रक्कम खर्च न करता याचा फायदा घेऊ शकतात !!!

अभिप्राय द्या!