घर, कार, इलेक्ट्रॉनिक्स अशी महागडी खरेदी करताना आपण प्रचंड संशोधन करतो. मग, इन्शुरन्स पॉलिसी ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी खरेदी करण्याच्या बाबतीत संपूर्ण प्रक्रिया एजंटवर सोपवून आपण इतके बिनधास्त कसे काय राहतो?

केवळ tax वाचविणे हाच उद्देश ध्यानी घेवून policyची खरेदी करू नका!!

इन्शुरन्स पॉलिसीचे मिस-सेलिंग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एजंटांवर प्रचंड विश्वास ठेवला जातो. एजन्सीसोबत दीर्घकाळ नाते, एजंट संभाव्य ग्राहकांचे नातेवाईक असणे अशा काही कारणांमुळे भारतात लोकांना विमा योजना खरेदी करण्याबाबत विचारणाऱ्यांना नकार देण्यात संकोच वाटतो.

ग्राहक म्हणून आपण ज्या प्रपोजल फॉर्मवर सही करतो तो कागद अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्यावरून आपली योजना एकतर जारी केली जाते किंवा नाकारली जाते. त्यामुळेच नेहमी हा अर्ज स्वतः भरावा, हे करणे कितीही कटकटीचे वाटले तरीही. हे काम एजंटवर सोपवल्यास चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. योजनाधारकाची जबाबदारी आवश्यक ती कागदपत्रे देणे आणि योग्य तिथे सही करणे यापुरती मर्यादित नसते. संबंधित उत्पादनाची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी आणि पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचण्यासाठी वेळ द्यावा.

गोड बोलणाऱ्या सेल्समनच्या बोलण्याला भुलून काहीजण घोटाळा आणि अनावश्यक विमा योजना या जाळ्यामध्ये अडकू शकतात. सेकंड ओपिनीअन घेणे केव्हाही चांगले. सर्व प्रमुख विमा कंपन्यांचे चोवीस तास टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. त्यावरून माहिती घेता येऊ शकते. व्यवहाराच्या दरम्यान केव्हाही असे वाटले की एजंट काहीतरी चुकीचे सांगत आहे, तर आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी थेट विमा कंपनीशी संपर्क साधलेला बरा.

शेवटी, एजंट कमिशनवर काम करतात आणि उत्तम आर्थिक सल्लागार म्हणून भूमिका फार क्वचित निभावू शकतात. तसेच, उत्पादनांची बारकाईने तुलना करता येईल अशा वेबसाइट उपलब्ध आहेत. कोणती योजना आपल्यासाठी योग्य आहे, ते ठरवण्यासाठी

टेक्नालॉजीचा वापर करणे हे सर्वोत्तम !!

 

 

अभिप्राय द्या!