शेअर बाजारात निरंतर सुरू असलेल्या बदलांनुसार आता डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडणे अतिशय सोपे झाले आहे. ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे. कारण आज जशा नवीन कंपन्या गुंतवणूकदारांना आजमावताना प्राथमिक खुल्या भागविक्रीतून (आयपीओ) घेऊन पुढे येत आहेत आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठीही डिमॅट खाती उघडली जात आहेत. ब्रोकरकडून मिळालेल्या फॉर्मवर पटापट सही करून दिली की खाते आता १५ ते २० मिनिटांत उघडण्याची सोय झाली आहे. पूर्वी अशा फॉर्मवर ५२ सह्य़ा कराव्या लागत होत्या, आता १९ सह्य़ांमध्ये डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्याची सोय झाली आहे. तसेच ऑनलाइन खाते उघडायचे असेल तर फक्त दोन सह्य़ा करून खाते उघडता येते. नॉमिनेशन (नामांकन) फॉर्म तसेच पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी या दोन ठिकाणी अजूनही खातेदाराची सही घेणे सेबीने बंधनकारक केले आहे. खातेदाराची बरीचशी माहिती आता आधार कार्डामुळे मिळू शकते आणि त्याचा उपयोग करून १५ ते २० मिनिटांत डिमॅट / ट्रेडिंग खाते उघडणे सोपे झाले आहे.

शेअरखान सावंतवाडी येथेही योग्य कागदपत्र असल्यास असे खाते आठ तासात उघडून व्यवहार सुरु करता  येतात !!

अभिप्राय द्या!

Close Menu