भारतात व्यक्तीगत फायनान्स बद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला दोन समस्या भेडसावतात.

१. इक्विटी मार्केट कॅपिटलायझेशनचा ८५% भाग प्रमोटर्स, एफआयआयएस आणि एलआयसी सारख्या संस्थांनी व्यापला आहे. भारताचे अर्थकारण आणि त्याच्या काल्पनिक विकासाची मालकी भारतीयांच्या मालकीचे नाही.

२. भारतात लोक स्थिर त्यांचा पैसा स्थिर दरावरच्या लहान बचत योजना, बॅंक डिपॉझिट्स, प्रॉव्हिडंट फंड आणि या प्रकारच्या योजनांमध्ये ठेवण्यात समाधान मानतात. हे सुरक्षित आहे, कारण त्या बचती आहेत. बचती संरक्षण देतात पण गुंतवणूकीपासून प्रगती होते .

आपला देश बचत करणा-यांवर गर्व करतो आणि आपल्याला सोन्याची अतिशय आवड आहे. आपण अशा देशात आहोत जेथे लोक चिट फंड्स आणि पॉन्झी योजनांमध्ये त्यांची मूळ रक्कम गमावतात .

आपण उच्च उत्पन्न मिळवण्याच्या चढाओढीमध्ये मूळ रक्कम विसरण्यासाठी ओळखले जातो.

आमच्या फंडांच्या नियामकांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे मूल्य सातत्याने कमी करत आणि कमिशन कमी करुन उत्तम कामगिरी बजावली आहे. १० वर्षांपूर्वी म्युच्युअल फंडासाठी आरंभीचे किंवा इनिशियल इश्यु खर्च असत (नवीन योजना उभारण्याचा खर्च) जे गुंतवणूकदारांवर लादले जात असत. युनिट्सच्या खरेदीवर एंट्री लोड असे, आणि रिडंप्शनवर एक्झिट लोड असे. यात भर म्हणून या लोड्सना वापरण्याच्या क्षमतेसाठी गुंतवणूकदारांच्या खर्चाने वितरकांना जादा कमिशन द्यावे लागण्याचा भार पडत असे. आता इनिशयल इश्यु खर्च आणि एन्ट्री लोड्सवर निर्बंध आणण्यात आला आहे. इक्झिट लोड्स आता कमी कालावधीतील व्यवहारापासून निवारक म्हणून काम करु शकता, पण त्यांना वितरकांना भरपाई देण्यासाठी वापरता येऊ शकत नाही आणि नजीकच्या काळातच AMFI ने   म्युच्युअल फंडांच्या वितरकांना देय असलेल्या कमिशनवर कॅप लावली आहे. त्यामुळे एंट्री कॉस्ट आणि एक्झिट कॉस्टचे आता जवळपास निर्मूलन करण्यात आले आहे आणि कमिशन्स नाकारण्यात आली आहेत.

तुम्ही तुमच्या वैद्यकीय जीवनामध्ये डॉक्टरला महत्व देता , त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक आयुष्यात तुम्ही सल्लागारासोबत असलेल्या तुमच्या संबंधांबद्दल सजग असणे देखील महत्वाचे आहे. डॉक्टर, वकील किंवा अकाऊंटंटसोबत व्यवहार करतेवेळी जर त्यांनी फी आकारली नाही तर तुम्हाला वेगळे वाटणार नाही का? सेवेसाठी दिल्या जाणा-या शुल्काच्या अनुपस्थितीचे तुमच्या मते तुम्हाला दिल्या गेलेल्या सेवेसाठी आणि तुमच्या सर्वोत्तम हितासाठी काम करण्यासाठी शुल्क देण्यास तुम्ही तयार असण्याचे काय कारण असू शकेल? जर तुम्ही तुमच्या घराचे इंटिरियर करुन घेत असाल आणि तुमच्या डिझायनरने तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले नाही तर त्याची किंवा तिची कमाई कशी होईल?

म्हणून सध्या सल्लागारांना  त्यानी दिलेल्या सल्ल्यासाठी स्वतंत्र फी आकारण्याची मुभा आहे .

स्थानिक वास्तविकतांकडे लक्ष न देता काही जागतिक कंपन्यांच्या आधारावर वाद घालणे, देशाच्या नागरिकांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्यावसायिक व्यवस्थापनाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी सुयोग्य कथन ठरणार नाही.

 

 

अभिप्राय द्या!