आजकाल तुम्हाला २००००० पौंडांची lottery रक्कम मिळणार आहे , तुम्ही अमुक / तमुक form पूर्ण करा व आपले पैसे घ्या अशा किंवा याहीपेक्षा मोठ्या रक्कमेच्या अमिषाचे लघुसंदेश किवा इमेल आला नाही असा एखादाच सापडेल !!
पण या भूलथापाना बळी पडताना —-
या ईमेलना फिशिंग मेल म्हणतात. यामध्ये बव्हंशी लॉटरी लागल्याचे किंवा तुमची निवड बक्षिसासाठी झाल्याचे सांगितले जाते. हे बक्षीस मिळवायचे असेल तर अमुक इतकी रक्कम जमा करायलाही सांगितले जाते. सामान्य लोक या संदेशांना भुलतात आणि आपली सर्व वैयक्तिक माहिती बँक खात्यासह देतात. यामुळे चौरांचे फावते. कदाचित अशा प्रकारे संदेश पाठवणाऱ्यांमध्ये अतिरेकी, आयएस संघटना किंवा स्थानिक चोर यांचा समावेश असतो. या संदेशांना भुलू नका, असे वारंवार यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.
रिझर्व्ह बँक कोणत्याही नागरिकाच्या नावे कधीही खाते उघडत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने कोणत्याही रकमेची मागणी करणे संभवत नाही. त्याचप्रमाणे बँक नागरिकाकडून त्याचा बँकविषयक तपशील कधीही मागवत नाही.
म्हणून
बक्षिसाच्या बदल्यात कधीही कुणालाही रक्कम देऊ नये
रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किंवा सरकार यापैकी कुणीही बक्षिसाचे ईमेल पाठवत नाही किंवा तसे एसएमएसही करत नाही हे लक्षात ठेवा.
असे मेल किंवा एसएमएस आल्यास रिझर्व्ह बँकेला ८६९१९६०००० या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.