भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ प्राथमिक समभाग विक्री अर्थात आयपीओ प्रक्रिया सोपी आणि गतिमान करण्याच्या प्रयत्नात आहे. आयपीओ  आणि शेअरची बाजारातील नोंदणी कालावधी सध्याच्या सहा दिवसांऐवजी चार दिवसांवर आणणार असल्याचे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी सांगितले आहे.
आयपीओ आणि  शेअरच्या लिस्टिंगच्या कालावधीत आधी देखील बदल करण्यात आला आहे. याआधी  सात दिवसांचा कालावधी लागत होता. तो आता सहा दिवसांवर आला आहे. आता प्रक्रिया आणखी गतिमान केली जाणार असून  तो चार दिवसांवर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे प्रक्रिया जलद पार पडून गुंतवणूकदारांचा निधी जास्त काळ अडकून राहणार नाही.

अभिप्राय द्या!