म्युच्युअल फंड व इक्विटी यांच्यात ऑनलाइन गुंतवणूक करता यावी यासाठी सुविधा देणाऱ्या फंड्सइंडियाने यूपीआय प्रणाली आपल्या अॅड्रॉइड अॅपवर देण्यासाठी येस बँकेचे साह्य घेतले आहे. त्यामुळे यूपीआय सेवा सुरू करणारी ऑनलाइन म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्याची सुविधा देणारी फंड्सइंडिया ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे.
म्युच्युअल फंडांसाठी यूपीआय प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे. एनईएफटी, नेट बँकिंग यापेक्षा यूपीआय वापरून म्युच्युअल फंडांचे व्यवहार अधिक जलद पूर्ण करता येतात. फंड्सइंडियाने यूपीआय सेवा सुरू केल्यामुळे तिला ५८ बँकांचे साह्य मिळाले आहे.

अभिप्राय द्या!