‘आरोग्यविमा पॉलिसीचे नूतनीकरण अगदी आयत्या वेळेस करणे हे जोखमीचे असते. शिवाय प्रत्येक विमा पॉलिसी ग्रेस पिरेड किंवा वाढीव मुदत द्यावी, असे विमा नियामक इरडाने सुचवले असले तरी, हा कालावधी द्यायचा की नाही हे सर्वस्वी संबंधित कंपनीवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्या आरोग्यविमा पॉलिसीला नूतनीकरणाची वाढीव मुदत एक महिना आहे असे गृहित धरून शेवटच्या क्षणी हे नूतनीकरण करू नये. नूतनीकरणाची अंतिम तारीख आणि वाढीव मुदत या दिवसांत तुमच्या आरोग्याची काही समस्या निर्माण झाली तर, तुम्हाला पॉलिसीचा लाभ देणे किंवा नाकारणे (नूतनीकरण झालेले नाही हे दाखवून) हे त्या कंपनीच्या हातात असते.’ तसेच तुमची आरोग्यविमा देणारी सर्वसाधारण विमा कंपनी चांगली सेवा देत असेल तर सतत विमा कंपनी बदलण्यात काहीच अर्थ नसतो, असे सांगून कर्णिक म्हणाले, त्यापेक्षा तुमच्या विमा कंपनीवर विश्वास टाकून तिच्याशी प्रामाणिक राहिल्यास, तुम्हाला या विम्याची गरज भासल्यास तुमचा दावा लवकर निकाली निघून तुम्हाला योग्य ते फायदे मिळण्याची शक्यता वाढते.

अभिप्राय द्या!