म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा दिवसेंदिवस ओढा वाढत असून चालू आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांची 95 लाख नवी खाती (फोलिओ) उघडण्यात आली आहेत. शेअर बाजारातील तेजीचा सकारात्मक परिणाम म्युच्युअल फंड उद्योगावरही होत आहे.

अॅम्फीने दिलेल्या माहितीनुसार, भारतामधील 42 म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता 20 लाख कोटी रुपयांच्यावर पोचली आहे. तसेच फोलिओंची संख्या साधारण 6 कोटी 49 लाख 21 हजार 686 कोटी इतकी झाली. मार्च 2017 अखेर फोलिओंची संख्या 5 कोटी 53 लाख 99 हजार 631 कोटी होती. त्यात 95.22 लाखांची भर पडली आहे.

म्युच्युअल फंडात एक गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराचे तीन फोलिओ असतात, असे जरी गृहीत धरले तरी 1.85 कोटी गुंतवणूकदार आहेत, असे म्हणता येईल. मागील एका वर्षात, म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेमध्ये तब्बल 40 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडमध्ये “सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’द्वारे (एसआयपी) महिन्याला साधारण एक कोटी गुंतवणूकदारांकडून मोठी गुंतवणूक करण्यात येते.

अभिप्राय द्या!