गुजरातमधील विधानसभा निकालाकडे शेअर बाजाराचे लक्ष होते. गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आली व त्यामुळे येथून पुढे काही कालावधीसाठी तरी अनिश्‍चितता संपली आहे. जे गुंतवणूकदार अजूनही काठावर बसले होते, त्यांनी आता गुंतवणुकीचा विचार नक्कीच केला पाहिजे. फक्त हे करताना कमीत कमी ३ ते ४ वर्षे मनात ठेवूनच गुंतवणूक करावी.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाजार हा नकारात्मकता पचवू शकतो; परंतु अनिश्‍चितता नाही. गुजरातमधील निवडणूक व त्याचे होणारे दूरगामी परिणाम यामुळे बाजारात असलेली अनिश्‍चितता आता संपली आहे. विविध राजकीय विश्‍लेषक त्यांच्या परीने या निकालांचे विश्‍लेषण करतीलच; परंतु हा विजय बाजारासाठी सकारात्मक ठरला आहे व गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आश्वासक असा आहे. त्यामुळे अशी संधीसाधावी असे आवाहन आहे !!

किमानपक्षी ELSS प्रकारचा म्युच्युअल फंड तरी घ्यावा असे आवाहन धनलाभ तर्फे करण्यात येत आहे !!

अभिप्राय द्या!