करबचतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम’ अर्थात ‘ईएलएसएस’ हा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरला आहे. या योजनांनी अन्य योजनांपेक्षा चांगला परतावा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या फंडांमध्ये किमान तीन वर्षांसाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते. ‘ईएलएसएस’ फंडांनी गेल्या तीन वर्षांत २० टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंडांमध्ये करबचत करणाऱ्या फंडांना ‘ईएलएसएस’ असे म्हटले जाते. या फंडांमध्ये किमान तीन वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तीन वर्षांनंतर गुंतवणूक काढता येते अथवा पुन्हा तशीच चालू ठेवता येते. तीन वर्षांनंतर अथवा त्यानंतर काढून घेण्यात येणाऱ्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. या फंडामध्ये कितीही रक्कम गुंतवता येते. मात्र, करसवलत केवळ दीड लाख रुपयांपर्यंतच मिळू शकते. गुंतवणूदार या योजनांमध्ये सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारेही गुंतवणूक करू शकतात.

बहुतेक सर्व फंड घराण्यांनी आपल्या ELSS योजना विक्रीसाठी खुल्या केल्या आहेत !! अधिक माहितीसाठी आमच्याकडे केव्हाही संपर्क साधावा !!

अभिप्राय द्या!