खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँक 24 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाने निधी उभारण्यासाठी मंजुरी दिली असून येत्या वर्षात  शेअरधारकांच्या मंजुरीसाठी 19 जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली आहे. बँक प्रवर्तक कंपनी एचडीएफसीला 8500 कोटी रुपयांचे प्रेफरेन्शियल शेअर जारी करणार आहे. उर्वरित 15500 कोटी रुपयांचे शेअर आणि कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातून क्यूआयपी आणि एडीआर/जीडीआरमधून जमा करण्यात येतील.

अभिप्राय द्या!