निर्देशांक सातत्याने वर जात असताना व चांगला परतावा देत असताना इक्विटी फंडांत एकगठ्ठा पैसे गुंतवायला गुंतवणूकदार बिचकत आहेत. या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक पुढील सहा ते १२ महिने फिरती ठेवावी व त्यासाठी सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लानचा (एसटीपी) वापर करावा, हे जास्त संयुक्तिक आहे.

म्हणून STP काय आहे ते समजून घेवू

 सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लान (एसटीपी) म्हणजे काय?

विशिष्ट कालावधीनंतर इक्विटी फंडांत गुंतवणूक फिरती ठेवण्यासाठी एसटीपी ही पद्धत वापरली जाते. यात गुंतवणूकदार लिक्विड किंवा अल्ट्रा-शॉर्टटर्म असा फंडातून एकगठ्ठा रक्कम गुंतवतो आणि ठराविक रक्कम दुसऱ्या योजनेत हस्तांतरित करतो. एकगठ्ठा रक्कम गुंतवली जाणारी योजना ही स्रोत योजना असते किंवा हस्तांतरित होणारी योजना असते, तर रक्कम हस्तांतरित केली जाणारी योजना ही लक्ष्य योजना असते. बहुतांश प्रकरणांत गुंतवणूकदार लिक्विड किंवा अल्ट्रा शॉर्टटर्म फंडात मोठी गुंतवणूक करतात आणि त्यातील काही हिस्सा नंतर इक्विटी किंवा बॅलन्स्ड फंडात टाकतात. जोखीम व उत्पन्न यांचा तोल राखण्यासाठी अवेक वित्त नियोजक गुंतवणूकदारांना एसटीपीचा सल्ला देतात. इक्विटी बाजारात चढउतार होत असेल, त्याचवेळी इक्विटी म्युच्युअल फंडात रक्कम गुंतवायची असेल व जोखीमविरहित उत्पन्न मिळवायचे असेल तर वरील पद्धत गुंतवणूकदारांनी अनुसरावी.

यासंबंधात जास्त माहिती हवी असल्यास धनलाभ च्या  कार्यालाय्शी संपर्क साधावा !!

अभिप्राय द्या!