गेल्याच आठवड्यात खासदार श्री. सचिन तेंडूलकर यांनी पाच वर्षात पहिल्यांदाच राज्यसभेत भाषण करण्याचा मनसुबा व्यक्त केला होता,पण त्यांना भाषण करता आले नाही . तथापि त्यांनी आपले भाषण social मेडिया मधून प्रसिद्ध केले व त्याला आतापर्यंत जवळ जवळ ३५ लक्ष लोकांनी likes दिल्या आहेत !! भारताने महासत्तेकडे वाटचाल करताना मैदानी खेळाकडे का लक्ष दिले पाहिजे हेच त्यांनी आपल्या भाषणातून त्यांनी उधृत केले आहे !! अन्यथा आज जवळजवळ प्रत्येक घरात एखाद्या व्यक्तीला झालेला मधुमेह हा आजार सर्व घरालाच बळकावू शकतो हे त्यांचे म्हणणे आहे !!
त्यादृष्टीने काही मंडळी आपला आरोग्यविमा आहे असे म्हणतील तथापि आरोग्य विम्याचा हप्ता सुद्धा खूपच वाढता आहे हेही त्यांनी ध्यानी घ्यावे .
कसा ते पहा .
“सध्या पाच लाखांच्या सर्वसाधारण आरोग्यविम्याचा वय वर्षे ६५च्या दाम्पत्यासाठी वार्षिक ८४,००० रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो. पाच वर्षांपूर्वी हाच प्रीमियम ५४,००० रुपये इतका भरावा लागत होता. पेन्शनवर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रीमियम भरणे अशक्यच आहे. आहे त्या वयात या नागरिकांना कंपनीही बदलणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर बहुतेक कंपन्यांनी आरोग्यविम्याचे प्रीमियम वाढवले आहेत. वाढलेल्या प्रीमियममुळे ज्यांनी आई-वडिलांसाठी आरोग्यविमा घेतला आहे, त्यांना आता दुप्पट प्रीमियम भरण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.”
म्हणून तरुणांनी आतापासून मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे हे सचिनचे म्हणणे अत्यंत कालानुरूप आहे हेच सर्वांनी ध्यानी घ्यावे !!
नववर्षाच्या शुभेच्छा देताना मैदानी खेळांचे महत्व बालकांना सांगण्यास विसरू नये हाच या वर्षाचा संदेश !!