शाळेतील एखादी स्पर्धा जिंकल्यास, क्रीडा प्रकारात यश मिळवल्यास किंवा वाढदिवसाला आलेल्या पाहुण्यांकडून आपल्या मुलांना कमीअधिक रोकड भेट म्हणून मिळते. ही रक्कम घरातच पडून राहण्यापेक्षा पालकांकडून या पैशाच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचा मार्ग स्वीकारलेला चांगला !!

लहान मूल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते का ?
म्युच्युअल फंडात १८ वर्षांखालील मुलाच्या नावे गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीला वयाची तसेच रकमेची कोणतीही मर्यादा नाही. लहान मुलाच्या नावे गुंतवणूक केल्यानंतर त्यासाठी त्या मुलाचेच नाव पहिले राहते. त्याच्या फोलिओसाठी संयुक्त धारक चालत नाही. या मुलाच्या फोलिओसाठी पालक म्हणून त्याचे आई-वडील (यापैकी एक) किंवा न्यायालयाने नियुक्त केलेली व्यक्ती लागते.
लहान मुलाच्या नावे गुंतवणूक करताना त्याच्या वयाचा वैध पुरावा द्यावा लागतो. तसेच तुमचे त्या मुलाशी असलेले नातेही स्पष्ट करावे लागते. याशिवाय, तुम्हाला तुमच्या लहान मुलाचा वयाचा दाखला, जन्मदाखला, पासपोर्ट (असल्यास) कॉपी इत्यादी द्यावे लागते. ही सर्व कागदपत्रे पहिली गुंतवणूक करताना किंवा नवा फोलिओ उघडताना द्यावी लागतात. एकाच फंडाच्या त्याच फोलिओमध्ये आणखी गुंतवणूक करताना मात्र ही कागदपत्रे पुनःपुन्हा द्यावी लागत नाहीत. पालकाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे भाग असते.

हि प्रक्रिया अत्यंत सोपी आहे व निश्चितच फायदेशीर पण आहे !!

अभिप्राय द्या!