“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला आज एकशे एक वर्षे पूर्ण झाली.

हा विचार करताना सहज मनात आले की, आज असे म्हणावे का, की पैसे मिळवणे हा माझा हक्क आहे आणि ते ‘नीट गुंतवणे’ ही माझी ओळख आहे.

अपार मेहनत करून पैसे मिळवले पण आकर्षक जाहिरातींच्या भुलाभूलैयांमध्ये सापडून ते चुकीच्या ठिकाणी गुंतवले गेले तर पदरी केवळ निराशा येते. नुकसानीचा जबर फटका बसतो. एखादी संवेदनशील व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जाऊन दुःखातून बाहेर पडण्यासाठी मृत्युलाही कवटाळते.

तर आपण नववर्षाचा असा संकल्प करू, ‘मेहनतीचे पैसे मिळवत राहीन आणि विचारांची मेहनत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करत राहीन’.

गीतारहस्यातून गीतेचा अर्थ सांगणाऱ्या लोकमान्यांना विनम्र अभिवादन करून आपणही आपल्या ‘अर्थाला’ निट सांभाळून जीवन सार्थ करूया.   

This Post Has 4 Comments

 1. Neelam Joshi.

  अरे वा. नेत्यांचा संदेश असा शंभर वर्षानंतरही मार्गदर्शन करु शकतो .

  1. Pradeep Joshi

   thanks

 2. Vandana

  उचित व योग्य संकल्प

  1. Pradeep Joshi

   thanks

अभिप्राय द्या!