गुजरातमधील निवडणूक निकालांनंतर सरकार खडबडून जागे झाले असून त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागावर सरकार लक्ष केंद्रित करेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद होऊ शकते. असे झाल्यास कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्या व उद्योग हे गुंतवणूकयोग्य ठरतील. बिगरबँक वित्तसंस्थांची कामगिरी नव्या वर्षात चांगली होणार आहे. त्यातही ग्रामीण वित्त पुरवठा करणाऱ्या बिगरबँक वित्तसंस्थांचा गुंतवणूकदारांनी विचार करावा. विजेची निर्मिती, वितरण, पारेषण या उद्योगांचीही भरभराट होणे अपेक्षित आहे. बँकिंग क्षेत्राला साधारणतः चांगले दिवस येणार असल्यामुळे खासगी बँकांचा विचार गुंतवणुकीसाठी करणे श्रेयस्कर ठरणार आहे. सरकारी बँकांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचा विचार करताना निवडक बँकांचाच विचार करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या दृष्टीने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नव गुंतवणूक वर्गाने ICICI prue ,किंवा UTI चे NFO विचारात घ्यावेत असे धनलाभ चे मत आहे !!

अभिप्राय द्या!