खाजगी क्षेत्रातील बॅंक असलेल्या ‘बंधन बॅंके’ने प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) 2500 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे. नवीन आर्थिक वर्षात आयपीओ बाजारात येणार असून बंधन बॅंकेने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केले आहे.

बॅंकेचा आयपीओच्या माध्यमातून दहा रुपये दर्शनी मूल्याचे 11.9 कोटी शेअर्स विक्रीचा प्रस्ताव आहे. बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर घोष म्हणले की, “आम्ही आयपीओ प्रक्रीयेसाठी पाच मर्चेंट बँकर्स नियुक्ती केली आहे. पुढच्या आर्थिक वर्षात आयपीओ आणून शेअर विक्री करण्याची योजना असून ऑगस्ट महिन्यात आयपीओ येण्याची शक्यता आहे.”

अभिप्राय द्या!