भारतीय आयुर्विमा महामंडळाची अर्थात एलआयसीची पॉलिसी आधार क्रमांकाशी जोडणे सर्व पॉलिसीधारकांसाठी अनिवार्य आहे. आधारबरोबरच पॅन क्रमांकही जोडणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत ही जोडणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यासाठी एलआयसीच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन (ऑफलाइन) ही प्रक्रिया पूर्ण करता येईल किंवा ऑनलाइन पद्धतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. ऑफलाइन पद्धतीपेक्षा ऑनलाइन पद्धत अधिक सोपी व सुटसुटीत करण्यात आली आहे. आयुर्विमा व बिगर आयुर्विमा अशा दोन्ही प्रकारच्या पॉलिसी आधारसंलग्न कराव्या लागणार आहेत.

शाखेत जाऊन आधार संलग्न करायचे असल्यास, त्यापूर्वी एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन एक अर्ज डाउनलोड करून भरावा लागेल. त्यामध्ये पॅन, आधार क्रमांक यासहित अन्य तपशील भरावा लागेल. नंतर या अर्जावर पॉलिसीधारकाने स्वाक्षरी करायची आहे. त्यासोबत फॉर्म ६०, आधार व पॅनची स्वयंसाक्षांकित प्रत जोडा.

अभिप्राय द्या!