फंडाच्या पोर्टफोलिओतील रोख्यापासून मिळणाऱ्या व्याजउत्पन्नावर लक्ष केंद्रित करणारे डेट फंड म्हणजे अॅक्रुअल फंड होय. याउलट ड्युरेशन फंडामध्ये व्याजदर खाली आलेल्या स्थितीत रोख्यांच्या भांडवल वृद्धीमुळे मिळणाऱ्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित केले जाते. भांडवली लाभापासून अॅक्रुअल फंड काही प्रमाणात उत्पन्न मिळवतात. परंतु हे उत्पन्न म्हणजे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या काही टक्केच असते. अॅक्रुअल फंडांचा रोखे खरेदी करून ते कायम ठेवण्याकडे कल असतो. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये जी आर्थिक साधने खरेदी केली जाते, ती त्यांची मुदतपूर्ती होईपर्यंत ठेवली जातात. याच्या तुलनेत फंड व्यवस्थापकाच्या दृष्टीकोनानुसार व्याजदरांचा आढावा घेऊन ड्युरेशन फंड राखले जातात.

व्याजदर कपातीला सुरुवात झाल्यावर अॅक्रुअल फंड हे वित्त सल्लागारांकडून सुचवले जातात. ड्युरेशन फंडांपेक्षा अॅक्रुअल फंड कमी चढउतार दाखवणारे असतात. अॅक्रुअल फंडांनुसार बाँड पोर्टफोलिओमध्ये भांडवल वृद्धी कमी प्रमाणात होते. त्यामुळे या तुलनेत ड्युरेशन फंड लवकर पडतात किंवा खाली येतात.

अॅक्रुअल फंड कुणी खरेदी करावेत?

डेट फंडात कमी चढउतारांची अपेक्षा करणाऱ्या व स्थिर उत्पन्नाची इच्छा मनात धरणाऱ्या गुंतवणूकदारांनी अॅक्रुअल फंड खरेदी करावेत. पारंपरिक मुदतठेवींच्या तुलनेत अॅक्रुअल फंड चांगला स्कोअर पटकावतात. उच्च कराच्या मर्यादेत असलेल्या गुंतवणूकदारांना या फंडातील गुंतवणुकीवर ३० टक्के कर न बसता इंडेक्सेशन लाभासह २० टक्के कर बसतो.

अभिप्राय द्या!